‘मी आता शांततेत शेवटचा श्वास…’, ’12th फेल’ फेम सेलिब्रिटीचं मोठं वक्तव्य, चाहते हैराण
vikrant massey 12th fail : 'मी आता शांततेत शेवटचा श्वास...', '12th फेल' सिनेमातील सेलिब्रिटी असं का म्हणाला? चाहत्यांना बसला धक्का..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांची चर्चा...

मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : ’12th फेल’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे वेगळं स्थान निर्माण केलं. विधू विनोद चोप्रा यांच्या ’12th फेल’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री मेधा शंकर हिने देखील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. सांगायचं झालं तर, सिनेमा चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरला, पण सिनेमाने अनेक पुरस्कार देखील स्वतःच्या नावावर केले आहे. फिल्मफेअरसोबत अनेक पुरस्कारांनी ’12th फेल’ सिनेमासा सन्मानित करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ’12th फेल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांच्या मनावर राज्य केल्यानंतर, विधू विनोद चोप्रा यांचा ’12th फेल’ सिनेमा जगभरात आपली ख्याती पसरवत आहे. सिनेमाला IMDb वर 10 पैकी 9.2 रेटिंग मिळालं आहे. सिनेमाने चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण केले असून यासोबतच सिनेमाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. एवढंच नाही तर हा जागतिक विक्रम करणारा हा एकमेव हिंदी चित्रपट आहे.
IMDb ने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या जगभरातील उत्तम सिनेमांची यादी जाहीर केली. त्यात 250 सिनेमांची नावे होती. या यादीत ’12th फेल’ सिनेमाला 50वं स्थान मिळालं आहे. या यादीत समाविष्ट झालेला हा एकमेव हिंदी सिनेमा आहे. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विधू विनोद चोप्रा म्हणाले, ‘मी आज देखील कश्मीर येथील लहान मुलगा आहे. ‘पॅराडिसो’ सिनेमासोबत माझा सिनेमा पाहाणं… मी काय सांगू? आता मी शांततेत शेवटचा श्वास घेऊ शकतो…’ असं देखील विधू विनोद चोप्रा म्हणाले. सध्या सर्वत्र विधू विनोद चोप्रा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
’12th फेल’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई
’12th फेल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कामगिरी केली. अनेकांनी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात कमाई केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमातील काही शॉर्ट सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहेत. सिनेमात अभिनेता विक्रांत मेस्सी याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
