AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद कांबळीची ‘फिल्मी लव्हस्टोरी’, हॉटेल रिसेप्शनिस्टसोबत अफेअर, बायकोला मारहाण… नशेमुळे सर्वकाही गमावलं

Vinod Kambli Love Marriage Story: कधी हॉटेल रिसेप्शनिस्टसोबत, तर कधी मॉडेलसोबत... विनोद कांबळीची 'फिल्मी लव्हस्टोरी...', बायकोला मारहाण... नशेमुळे सर्वकाही गमावलं... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विनोद कांबळी याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

विनोद कांबळीची 'फिल्मी लव्हस्टोरी', हॉटेल रिसेप्शनिस्टसोबत अफेअर, बायकोला मारहाण... नशेमुळे सर्वकाही गमावलं
| Updated on: Dec 13, 2024 | 12:35 PM
Share

Vinod Kambli Love Marriage Story: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी याच्या आयुष्यातील कठीण काळ सध्या सुरु आहे. विनोद कांबळी सध्या फक्त आर्थिक परिस्थितीचा सामना करत नाही तर, त्यांची प्रकृती देखील अस्थिर आहे. क्रिकेटविश्वातील पक्षपातीपणामुळे त्याच्या कारकिर्दीला फटका बसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे, तर बहुतेक लोक त्यासाठी त्याच्याच चुका जबाबदार आहेत… असं म्हणत आहे. सांगायचं झालं तर, विनोद कांबळी फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला. कधी हॉटेल रिसेप्शनिस्टसोबत, तर कधी मॉडेलसोबत विनोद कांबळीचं नाव जोडण्यात आलं. विनोद कांबळी याची लव्हस्टोरी एका फिल्मी कथेपेक्षा कमी नाही…

विनोद कांबळी दोन वेळा लग्नबंधनात अडकला. पण आता देखील तो दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहे की नाही… याबद्दल काही कळू शकलेलं नाही. पण 2023 मध्ये विनोद कांबळीच्या दुसऱ्या पत्नीबद्दल चर्चा रंगली होती. जेव्हा तिने विनोदवर मारहाण करत असल्याचे आरोप केले होते.

विनोद कांबळी याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पुण्यातील एक हॉटेल रिसेप्शनिस्ट नोएला लुईस हिच्या प्रेमात विनोद होता. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

नोएला लुईस हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर विनोद कांबळी आणि फॅशन मॉडेल एंड्रिया ह्यूइट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. एंड्रिया हिच्यासोबत लग्न करण्यासाठी विनोदने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. जवळपास 6 वर्ष एकमेकामेकांना डेट केल्यानंतर दोघांन लग्न केलं. 2006 मध्ये एंड्रिया ह्यूइट आणि विनोद कांबळी यांनी कोर्ट मॅरिज केलं.

लग्नानंतर एंड्रिया ह्यूइट हिने मुलगी जीसस आणि मुलगा जोहाना यांना जन्म दिला. कोर्ट मॅरिज केल्यानंतर देखील एंड्रिया ह्यूइट आणि विनोद कांबळी यांनी 2014 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर काही वर्ष विनोद कांबळी याने वैवाहिक आयुष्याचा आनंद घेतला.

पण 2023 मध्ये एंड्रिया ह्यूइट आणि विनोद कांबळी यांच्या आयुष्यात अडचणी सुरु झाल्या. कांबळी आणि एंड्रिया ह्युएट वाईट टप्प्यातून जात असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं. दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागल्यानंतर एंड्रिया हिने वांद्रे पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला. एंड्रियाने खुलासा केला की कांबळीने तिच्यावर कुकिंग पॅन फेकले, ज्यामुळे एंड्रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या बातमीने संपूर्ण भारतात खळबळ उडाली, पण कांबळीला अटक झाली नाही. आता दोघे एकत्र राहतात की नाही हे माहीत नाही.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...