Vamika | विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक!

आता स्वतः विरुष्काने त्यांच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच अनुष्काने त्यांच्या मुलीचे नावही जाहीर केले आहे.

Vamika | विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक!
विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण

मुंबई : गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ‘पालक’ बनले होते. या दोघांनीही त्यांच्या मुलीला ‘पापराझीं’च्या नजरेपासून दूर ठेवले होते. मात्र, आता स्वतः विरुष्काने त्यांच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच अनुष्काने त्यांच्या मुलीचे नावही जाहीर केले आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. ‘वामिका’ हे नावदेखील विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकारण करून बनवण्यात आले आहे (Virat and Anushka Shares daughter Vamika first photo on social media).

याचबरोबर अनुष्काने चाहत्यांच्या या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी आभार देखील व्यक्त केले आहे. अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या गोड फोटोत ‘वामिका’ला म्हणजेच मुलीला आपल्या हातात उचलून घेतले आहे. आणि विरुष्का त्यांच्या लेकीकडे कौतुकाने बघत आहेत.

अनुष्काची खास पोस्ट!

हा फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले की, ‘आम्ही प्रेमाने एकत्र राहिलो, परंतु एका लहान मुलीच्या आगमनाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच टप्प्यात आले आहे. अश्रू, हास्य, तणाव अशा संमिश्र भावना आता आहेत. झोपेची कमतरता आहे, परंतु हृदय प्रेमाने भरले आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आणि प्रेमाबद्दल तुमचे मनापासून आभार.’

(Virat and Anushka Shares daughter Vamika first photo on social media)

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ‘विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.’

काही दिवसांपूर्वी अनुष्काने वोग (Vogue) या मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत बाळाच्या संगोपनाबाबतची माहिती दिली होती. मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात. त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करण्यासही शिकवले जाते. तुम्हाला मुलांसाठी स्वत: हे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते, असे अनुष्का म्हणाली होती.

(Virat and Anushka Shares daughter Vamika first photo on social media)

हेही वाचा :

Published On - 11:58 am, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI