टॉयलेट क्लीनरच्या एका जाहिरातीने अभिनेत्याला मिळवून दिलं आलिशान घर, म्हणाला…

Harpic Toilet Cleaner च्या एका जाहिरातीमुळे बदललं अभिनेत्याचं आयुष्य... मुंबईत आलिशान घर घेतलं आणि... खुद्द अभिनेत्याने सांगितलं दोन वर्षांनंतर त्याच्यासोबत काय आणि कसं झालं...

टॉयलेट क्लीनरच्या एका जाहिरातीने अभिनेत्याला मिळवून दिलं आलिशान घर, म्हणाला...
फाईल फोटो
| Updated on: Sep 05, 2025 | 8:18 AM

Harpic Toilet Cleaner च्या एका जाहिरातीमुळे अभिनेत्याला लोकप्रियता मिळाली आणि त्याने मुंबईत आलिशान घर घेतलं. या टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीमुळे एक नाही तर दोण जणांना वेगळी ओळख मिळवून दिली. पहिला Hussain Kuwajerwala आणि दुसरा Vishal Malhotra… विशाल गेल्या 30 वर्षांपासून झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. पण आज ते काही यश मिळालेलं ते टॉयलेट क्लीनरच्या एका जाहिरातीमुळे मिळालं आहे… असं स्वतः विशाल म्हणतो… ज्यामुळे अभिनेता वांद्रे याठिकाणी स्वतःचं घर देखील घेऊ शकला…

विशाल याने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ सिनेमात अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. विशाल याने सिनेमात शाहिद याच्या मित्राची भूमिका साकारली. सिनेमुळे विशाल याच्या लोकप्रियतेत वाढ तर झाली. पण त्याला टाईपकास्त करण्यात आलं. एवढंच नाही तर, त्याला सतत सहाय्यक अभिनेता म्हणून काम मिळू लागलं. अशात अभिनेत्याने सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या मित्राची भूमिका नाकारली आणि दुसरी भूमिका देण्यास दिर्गर्शकांना सांगितलं… त्याचा फार मोठा फटका अभिनेत्याला बसला…

एका मुलाखतीत विशाल म्हणाला, ‘मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मागितल्या. तर माझी ही इच्छा निर्माते दिग्दर्शकांना आवडली नाही. त्याचे परिणाम देखील फार वाईट झाले, ज्यासाठी मी बिलकूल तयार नव्हतो… जेव्हा एक पॉव्हरफूल व्यक्ती तुम्हाला नकार देतो, तेव्हा तुमचं करीयर संपतं. त्यानंतर दोन वर्ष मला कायम मिळालं नाही… ज्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘त्यानंतर मला एक जाहिरातीसाठी विचारण्यात आलं… तेव्हा इतरांप्रमाणे माझ्या मनात देखील एक प्रश्न आला हार्पिक एक टॉयलेट क्लीनर ब्रँड आहे… याचा परिणाम माझ्या ओळखीवर पडेल? पण मी त्या जाहिरातीत काम केलं. कारण त्याआधी मला मॅम्बो वेताल नावाने ओळखलं जात होतं… पण हार्पिक टॉयलेट क्लीनमुळे मला एक नवीन ओळख मिळाली आणि शाहरुख खान त्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.’

हार्पिकमुळे किती पैसे मिळाले? असा प्रश्न देखील अभिनेत्याला विचारण्यात आला. ‘मी इतकी कमाई केली मी स्वतःसाठी वांद्रे याठिकाणी घर घेतलं आहे. माझ्याकडे आज देखील कार नाही. मी ओला, उबरने प्रवास करतो. माझ्याकडे एका इलेक्ट्रिक हीरो सायकल आहे. माझ्या बायकोकडे कार आहे. मुलांना सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी त्या कारचा वापर होतो. मला साधं आयुष्य जगायला आवडतं…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

विशाल याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘कॉन्स्टेबल गिरपडे, ‘मीठा खट्टा प्यार हमारा’ आणि ‘बंदा ये बिंदास है’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय अभिनेत्याचं स्वतःचं ‘द विशाल आवर’ नावातं पॉडकास्ट देखील आहे.