Shah Rukh Khan स्टारर पठाण सिनेमाला विरोध कायम ; सिनेमागृहात तोडफोड, पाच जणांना अटक

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 9:32 AM

‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाच्या दोन दिवस पूर्वी देखील सिनेमाच्या विरोधात वाद टोकाला पोहोचला आहे. बेशर्म रंग गाण्यामुळे सिनेमाला होतोय विरोध..

Shah Rukh Khan स्टारर पठाण सिनेमाला विरोध कायम ; सिनेमागृहात तोडफोड, पाच जणांना अटक
Shah Rukh Khan स्टारर पठाण सिनेमाला विरोध कायम ; सिनेमागृहात तोडफोड, पाच जणांना अटक

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ (pathan) सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाच्या दोन दिवस पूर्वी देखील सिनेमाच्या विरोधात वाद टोकाला पोहोचला आहे. दीपिका पादुकोण हिने सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे अद्यापही सिनेमाला विरोधाचा सामना करावा लागत आहे. नुकताच गुजरात मधील सुरत याठिकाणी सिनेमाला होत असलेला तिव्र विरोध पाहायला मिळाला. सुरतमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तोडफोड केली. ज्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

सिनेमाला विरोध करत सिनेमागृहात तोडफोड केल्यामुळे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सिनेमागृहात काही लोक पोस्टर फाडून सिनेमाचा विरोध करत असल्याची तक्रार मिळाली. तक्रार केल्यानंतर कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ते विश्व हिंदू परिषदशी संबंधीत आहेत.’

शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमा ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे अनेक धमक्यांचा सामना करत आहे. काही संघटनांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे सिनेमा प्रदर्शनाच्या दोन दिवस पूर्वी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक संघटना आणि राजकर्त्यांनी सिनेमाता विरोध केला आहे.

दरम्यान, ‘बेशर्म रंग’ गाण्यामुळे होत असलेल्या विरोधाचा सिनेमाला कोणताही फरक पडत नसल्याचं दिसत आहे. सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहेत. ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने मोठा गल्ला जमा केला आहे. सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करु शकतो.

हे सुद्धा वाचा

पठाणमुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. प्रदर्शनापूर्वी मोठ्या संख्येने तिकिटांची विक्री झाल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI