AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायसोबत अफेअर प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, ‘कोणाला सोडून जायचं असेल तर…’, चर्चांना उधाण

Aishwarya Rai Bachchan Love Life: आजही रंगतात ऐश्वर्या रायच्या अफेअरच्या चर्चा, ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर अभिनेता म्हणाला, कोणाला सोडून जायचं असेल तर...', ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

ऐश्वर्या रायसोबत अफेअर प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, 'कोणाला सोडून जायचं असेल तर...', चर्चांना उधाण
फाईल फोटो
| Updated on: Mar 11, 2025 | 3:05 PM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केलं आणि अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या हिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेता सलमान खान याला डेट केलं होतं. पण दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नपर्यंत पोहोचलं नाही. दरम्यान, एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय याने टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत विवेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यापासून अभिनेता अभिषेक बच्चन बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

अभिनेता म्हणाला, ‘ऐश्वर्यासोबत माझं ब्रेकअप वर्ल्ड न्यूज झालं होतं. पण त्यातून बाहेर येणं माझ्यासाठी चांगलं होतं. जर तुमच्या आयुष्यातून कोणाला जायचं असेल तर जाऊद्या. जसं की एका लहान मुलाचं लॉलीपॉप खाली पडल्यानंतर त्याची आई सांगते खाली पडलेल्या वस्तू पुन्हा उचलायच्या नसतात… त्याच प्रमाणे आयुष्य देखील तुम्हाला नवा जोडीदार देईल…’

‘मी याठिकाणी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे. कधी – कधी आपण वेदनादायी नात्यात असतो… काही नाती फक्त तुमचा वापर करतात. त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच किंमत नसते. तुम्हाला सन्मान मिळत नाही. अशा नात्यात तुम्ही देखील गुंतले जाता. कारण तुम्हाला तुमची किंमत माहिती नसते… कधीकधी तुम्हाला असं वाटतं की नशिबाला जे हवं आहे ते होईल परंतु तुम्ही तुमचा स्वाभिमान कधीही गमावू नये.’ असं देखील अभिनेता म्हणाला…

ऐश्वर्या राय – विवेक ओबेरॉय

सांगायचं झालं तर, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट झाला. विवेकने तर प्रेस कॉन्फ्रेंस घेत सलमान खानवर गंभीर आरोप केले होते. ऐश्वर्या राय आणि सलमान खान

‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान समलान आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष सलमान आणि ऐश्वर्या एकत्र होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण त्यांच्या रिलेशनलशिपच्या आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा