तुझ्याशिवाय या भिंतींना अर्थ नाही..; पत्नीसाठी विवेक ओबेरॉयची खास पोस्ट

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि प्रियांका अल्वा यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्त विवेकने सोशल मीडियावर पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. दिवाळीनिमित्त विवेकने नवीन घर विकत घेतलं. याच घरातील फोटो त्याने पोस्ट केला आहे.

तुझ्याशिवाय या भिंतींना अर्थ नाही..; पत्नीसाठी विवेक ओबेरॉयची खास पोस्ट
विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांकाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 2:29 PM

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने पत्नीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. विवेकने दिवाळीनिमित्त नवीन घर घेतलं असून याच घरातील पत्नीसोबतचा फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विवेकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आर. माधवननेही विवेकला नवीन घर घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

विवेक ओबेरॉयची पत्नीसाठी पोस्ट-

’14 वर्षांपूर्वी मी अग्नीच्या साक्षीने तुझ्यावर अखंड प्रेम करण्याचं वचन दिलं होतं. आज धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी मोठ्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या सुंदर नवीन घरात जात असताना, मी देवाचे खूप मनापासून आभार मानतो. तुझ्याशिवाय या आलिशान भिंतींना काही अर्थ नाही. माझ्यासाठी तू माझं चिरंतन घर आहेस आणि तिथेच माझं हृदय आहे. तुझ्यावर नेहमीच माझं प्रेम असेल, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’ अशा शब्दांत विवेकने भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विवेकचं अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतचं अफेअर जगजाहीर होतं. मात्र या दोघांच्या नात्याचा शेवट गोड होऊ शकला नाही. ब्रेकअपनंतर विवेकला दुसरं कोणाशीच लग्न करायचं नव्हतं. मात्र फ्लोरेन्समधील त्या एका संध्याकाळने सर्वकाही बदललं आणि तिथेच विवेक त्याची भावी पत्नी प्रियांका अल्वाला भेटला. पहिल्या भेटीच्या 48 तासांत प्रियांकाच आपली आयुष्यभराची जोडीदार होईल, याचा निर्णय विवेकने घेतला होता. एका मुलाखतीत विवेकने त्याच्या लग्नाची गोष्ट सांगितली होती. आयुष्यातील सर्वांत वाईट हृदयभंग अनुभवल्यानंतर विवेकला पुन्हा त्याच्याजवळ कोणालाच येऊ द्यायचं नव्हतं. मात्र प्रियांकाचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्यासाठी सर्वकाही बदललं.

पहिल्या भेटीतच विवेकला प्रियांका आवडली होती. याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि ते तासनतान एकमेकांशी गप्पा मारू लागले होते. विवेक प्रियांकासोबतच्या गप्पांमध्ये इतका रमला होता की त्याची भारतात येणारी फ्लाइटसुद्धा चुकली होती. भेटीनंतर प्रियांकाने तिच्या हॉटेलपर्यंत सोडलं आणि त्याठिकाणी तो तिच्या कुटुंबीयांशी भेटला. दुसऱ्या दिवशी विवेकने प्रियांकाला तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय सांगितला. “मी माझ्या आयुष्यात जर कधी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर तो तुझ्याशीच करेन. जर मी तुझ्याशी लग्न केलं नाही तर कोणाशीच करणार नाही. बाकी तुझा निर्णय आहे. तू तुझा वेळ घे आणि मला कळव”, असं विवेकने सांगितलं होतं.

Non Stop LIVE Update
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड.
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध.
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'.
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.