AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत

देशभरात सध्या एकच मुद्याची चर्चा होत आहे आणि तो म्हणजे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक उपोषणाला बसून आता 20 दिवस झाले आहेत. त्यांच्या उपोषणावर अनेक सेलिब्रिटींनी आपले मत मांडले आहे. आता यावर विवेक ऑबेरोयला प्रश्न विचारताच तो काय म्हणाला ते पाहा...

Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण... सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत
vivek oberoi on sonam wangchuk
| Updated on: Jul 17, 2026 | 1:36 PM
Share

सोनम वांगचुकचा उपोषण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. अनेक चित्रपट कलाकारांनी त्याला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी यावर भाष्य करायचे नाही असंही ठरवले आहे.  दरम्यान, जेव्हा अभिनेता विवेक ओबेरॉयला या विषयावर विचारण्यात आले, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरामुळे सोशल मीडियावर एका नवीन चर्चेला सुरुवात झाली. विवेकने स्पष्टपणे सांगितले की तो एक अभिनेता आहे, राजकारणी नाही. त्याचे हे विधान इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाले. काहींना त्याचे विधान योग्य वाटले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली. त्याची मुलाखत सतत चर्चेत राहिली आहे. एका मीडिया संवादादरम्यान, विवेक ओबेरॉयला सोनम वांगचुकच्या आंदोलनाबद्दल आणि उपोषणाबद्दल विचारण्यात आले. त्याने उत्तर दिले, “मी एक अभिनेता आहे, राजकारणी नाही. मी राजकारणाकडे फारसे लक्ष देत नाही. मी फक्त गोष्टींचे निरीक्षण करतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.” त्याने उघडपणे कोणतीही भूमिका न मांडणं हे निवडलं.

विवेकने या आंदोलनाला पाठिंबा किंवा विरोध केला नसला तरी, त्याने लोकशाहीबद्दल आपले विचार व्यक्त केले. तो म्हणाला की, “एका चांगल्या लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार असावा. जर लोक आवाज उठवत असतील, तर ही लोकशाहीची चांगली गोष्ट आहे. या संपूर्ण प्रकरणातून आपण हेच शिकलो,” असे तो म्हणाला.

विवेक ओबेरॉयने या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले असले तरी, प्रकाश राज, विशाल दादलानी, नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, सयाजी शिंदे, सोनाक्षी सिन्हा, कुनिका सदानंद आणि देवोलीना भट्टाचार्जी, शबाना आझमी, इमरान खान, फातिमा सना खान, आदिती राव हैदरी, अनुराग कश्यप, अभय देओल, झिनत अमान, रत्ना पाठक शाह, ओम वैद्य, स्वरा भास्कर, सोनी राझदान, रुबीना दिलैक, समय रैना यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुकच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर वांगचुक यांच्या समर्थनात पोस्ट केल्या आहेत. यामुळे आता विवेकने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...