AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवेक ओबेरॉयने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू; सलमान खानविरोधातील ‘त्या’ प्रेस कॉन्फरन्सबद्दल म्हणाला..

विवेक ओबेरॉयने 1 एप्रिल 2003 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खानविरोधात गंभीर आरोप केले होते. सलमानने त्याला फोन करून धमकी दिल्याचा खुलासा त्याने केला होता. त्यावेळी विवेक अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करत होता.

विवेक ओबेरॉयने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू; सलमान खानविरोधातील 'त्या' प्रेस कॉन्फरन्सबद्दल म्हणाला..
Salman Khan and Vivek OberoiImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 04, 2023 | 3:16 PM
Share

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने 1 एप्रिल 2003 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. या पत्रकार परिषदेत त्याने फिल्म इंडस्ट्रीच्या कटू सत्यावर प्रकाश टाकला होता. आता 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमधल्या लॉबिंग आणि धमकावण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. बॉलिवूडमध्ये मला एका कोपऱ्यात ढकलण्यात आलं होतं, म्हणूनच मी अमेरिकेला गेले, असा खुलासा प्रियांकाने तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. आता विवेक ओबेरॉयसुद्धा बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. “या कठीण परीक्षेतून मी पुढे आलो आणि वाचलो. पण प्रत्येकजण इतका नशिबवान नसतो”, असं तो म्हणाला.

“इंडस्ट्रीची काळी बाजू”

“मी अशा बऱ्याच गोष्टींचा सामना केला, ज्याची काहीच गरज नव्हती. इंडस्ट्रीतील लॉबी, एकमेकांना धमकावणं, हक्क गाजवणं या सर्व गोष्टींकडे प्रियांकानेही इशारा केला. दुर्दैवाने ही आपल्या इंडस्ट्रीची ओळख आहे. आपल्या इंडस्ट्रीच्या काळ्या बाजूंपैकी ही एक आहे आणि त्याचा सामना मी केला होता. हे खूपच निराशाजनक आहे आणि त्यामुळे कोणालाही कमीपणा वाटू शकतो. मी ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’सारखा यशस्वी चित्रपट केला आणि त्यानंतर 14 महिने घरी बसून राहिलो. मला कामच मिळत नव्हतं. त्या परिस्थितीतून मला बाहेर यायचं होतं. म्हणून मी माझं लक्ष दुसरीकडे वळवलं. प्रियांकानेही जे केलं ते खूप प्रेरणादायी आहे”, असं विवेक म्हणाला.

“बॉलिवूड इंडस्ट्री अत्यंत असुरक्षित”

“ही इंडस्ट्री अत्यंत असुरक्षित जागा आहे. कलाकार स्वाभाविकपणे अत्यंत नाजूक स्थितीत असतात. अशा वेळी मी टूची प्रकरणं, कास्टिंग काऊच, धमकावणे, गटबाजी करणे अशा गोष्टींमुळे कलाकारांमधील कल्पकतेच्या आनंदाला संपते. मला या गोष्टीचं समाधान आहे की त्याबद्दल आता किमान बोललं तरी जातंय”, असं तो पुढे म्हणाला.

“चुकीची वागणूक मिळत असेल तर बोलू नये का?”

इंडस्ट्रीत आधी या गोष्टी मोकळेपणे बोलल्या नाही जायच्या, असंही त्याने सांगितलं. याविषयी विवेक म्हणाला, “मी जेव्हा त्याविरोधात आवाज उठवला होता, तेव्हा मला अनेकांचे फोन आले. तू याविषयी बोलू नकोस, असा त्यांचा सल्ला होता. हे जणू एका कौटुंबिक सीक्रेटप्रमाणे आहे. मात्र जर तुमच्या कुटुंबात एखाद्याला चुकीची वागणूक मिळत असेल तर त्याविषयी आपण बोलू नये का? खासगी विषय आहे म्हणून आपण गप्प राहावं का? हा तर मूर्खपणा आहे. आता सुदैवाने लोक त्याविषयी मोकळेपणे बोलत आहेत. हल्लीचे चाहतेसुद्धा कलाकारांविषयी अधिक जागरूक झाले आहेत.”

“सुशांतने टोकाचं पाऊल उचलायला पाहिजे नव्हतं”

यावेळी त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही उल्लेख केला. सुशांतने टोकाचं पाऊल उचलायला पाहिजे नव्हतं, असं तो म्हणाला. “सुशांत सिंह राजपूतने आपला जीव गमवायला पाहिजे नव्हता. काहीही झालं तरी त्या गोष्टींचा सामना करायला पाहिजे. हे फारच दु:खद आहे. तो अत्यंत प्रतिभावान अभिनेता होता. मात्र त्याच्याकडे चांगले मित्र असायला हवे होते. तुम्ही इंडस्ट्रीला जर कुटुंब म्हणत असाल तर कुटुंबाने एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे”, असं मत त्याने मांडलं.

विवेक ओबेरॉयने 1 एप्रिल 2003 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खानविरोधात गंभीर आरोप केले होते. सलमानने त्याला फोन करून धमकी दिल्याचा खुलासा त्याने केला होता. त्यावेळी विवेक अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करत होता आणि ऐश्वर्या एकेकाळी सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.