AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, 600 कलाकारांचं पत्र लिहून आवाहन

मुंबई : अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपला मत न देण्याचं आवाहन केलंय. या सर्व कलाकारांनी एक पत्र लिहून जनतेला आवाहन केलंय,  मतदानाच्या माध्यमातून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला सत्तेपासून दूर ठेवा. हे आवाहन करणाऱ्या अभिनेत्यांमध्य अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एमके रैना आणि उषा गांगुली यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पीटीआयच्या […]

भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, 600 कलाकारांचं पत्र लिहून आवाहन
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपला मत न देण्याचं आवाहन केलंय. या सर्व कलाकारांनी एक पत्र लिहून जनतेला आवाहन केलंय,  मतदानाच्या माध्यमातून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला सत्तेपासून दूर ठेवा. हे आवाहन करणाऱ्या अभिनेत्यांमध्य अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एमके रैना आणि उषा गांगुली यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत आणि संविधान धोक्यात असल्याचं या कलाकारांचं म्हणणं आहे. हे पत्र 12 भाषांमध्ये तयार करुन आर्टिस्ट युनायटेड इंडिया वेबसाईटवर टाकण्यात आलंय.

काय आहे पत्रात?

“आगामी लोकसभा निवडणूक ही देशातील सर्वात गंभीर निवडणूक आहे. आज गीत, नृत्य, हास्य धोक्यात आहे. आपलं संविधान धोक्यात आहे. जिथे तर्क, वितर्क आणि चर्चा होतात अशा संस्थांचा सरकारने गळा दाबलाय. एखाद्या लोकशाहीला सर्वात कमकुवत आणि सर्वात वंचित लोकच बळकट बनवू शकतात. कोणतीच लोकशाही प्रश्नाविना, चर्चेविना आणि मजबूत विरोधकांशिवाय चालू शकत नाही. या सर्वच गोष्टी सध्याच्या सरकारने पायदळी तुडवल्या आहेत. सर्व जण भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी मतदान करा. संविधानाचं संरक्षण करा आणि कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून बाहेर करा”, असा मजकूर या पत्रात आहे.

वाचा – मला माझ्या मुलांची चिंता वाटते : नसीरुद्दीन शाह

या पत्रावर शांता गोखले, महेश एलकुंचेवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, ललित दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे आणि अनुराग कश्यप यांची स्वाक्षरी आहे.

दरम्यान, यापूर्वी 100 पेक्षा जास्त सिनेनिर्मात्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. काही वृत्तांनुसार, यामध्ये मल्याळम दिग्दर्शक आशिक अबू, आनंद पटवर्धन, सुदेवन, दीपा धनराज, गुरविंदर सिंह, पुष्पेंद्र सिंह यांची नावं होती.

नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वीच असहिष्णुतेवर बोलत नव्या वादाला तोंड फोडलं होतं. त्यांच्यानंतर अमोल पालेकर यांनीही पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सद्यपरिस्थितीकडे लक्ष वेधलं होतं. आता विविध कलाकारांनी थेट भाजपविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...