कोणत्या मुस्लिम नेत्याची सून आहे आयेशा टाकिया? लग्नानंतर अचानक झाली गायब
Ayesha Takia: कोणत्या मुस्लिम नेत्याची सून आहे आयेश टाकिया, काय करतो अभिनेत्रीचा नवरा? लग्नानंतर अभिनेत्री अचानक झाली गायब, आता करते तरी काय? आयेशा हिने अनेक सिनेमांमध्ये केलीय दमदार अभिनय

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री आयेशा टाकिया हिच्या सौंदर्याची आणि सिनेमांची चर्चा होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून ‘वॉन्टेड’ फेम अभिनेत्री आयेशा झगमगत्या विश्वापासून दूर आहे. आयेशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये करियर यशाच्या शिखरावर असताना आयेशा हिने वयाच्या 23 व्या वर्षी फरहान आझमी याच्यासोबत लग्न केलं. आयेशा हिच्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं तर, फरहान आझमी एक उद्योजक आहे. 1 मे 2009 मध्ये आयेशा आणि फरहान आझमी यांनी लग्न केलं.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आयेशा हिने झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. आयेशा आणि फरहान यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव मिखाइल आझमी असं आहे.
View this post on Instagram
कोणत्या मुस्लिम नेत्याची सून आहे आयेशा?
आयेशा टाकिया हिने सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्यासोबत लग्न केलंय. म्हणजे आयेशा अबू आझमी यांची सून आहे. अबू आझमी 2009 पासून मुंबई येथील मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघाचे आमदार आहेत.
View this post on Instagram
आयेशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने मॉडेल म्हणून करीयरची सुरुवात केली. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टार्झन द वंडर कार’ सिनेमाच्या माध्यमातून आयेशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आयेशा हिने ‘टार्झन: द वंडर कार’, ‘वॉन्टेड’ आणि ‘दिल मांगे मोर’ यांसरख्या सिनेमांमध्ये काम केलं.
आयेशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर आयेशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री आजही स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्री मुलगा आणि नवऱ्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते.
