WAVES 2025: संगीतापासून चित्रपट निर्मितीपर्यंत… ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ च्या विजेत्यांची यादी

मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये गुरुवारपासून WAVES समिट 2025 चे उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवशी 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली... पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी...

WAVES 2025: संगीतापासून चित्रपट निर्मितीपर्यंत... क्रिएट इन इंडिया चॅलेंज च्या विजेत्यांची यादी
WAVES 2025
| Updated on: May 03, 2025 | 8:28 AM

WAVES 2025: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या वेव्हज समिट 2025 चा दुसरा दिवस ‘वेव्हज क्रिएट इन इंडिया चॅलेंज अवॉर्ड्स’ ला समर्पित होता. भारतात नवोन्मेष, सर्जनशीलता आणि ‘मेक इन इंडिया’ची भावना साजरी करण्यात आली. 4 दिवसांच्या दिवसांच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण सिंग छाब्रा यांनी केले होते.

सोहळ्यात 60 हून अधिक देशांतील एक लाखाहून अधिक दिग्गज सहभागी उपस्थित होते. यावेळी इंडिया टुडे ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अरुण पुरी यांच्यासह अनेक विशेष पाहुणे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

विविध श्रेणीतील विजेत्यांची संपूर्ण यादी

संगीत श्रेणी

– सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पुरस्कार प्रदान केले.

कम्युनिटी रेडिओ कंटेंट चॅलेंज

– कांस्य: रेडिओ मंजिरा 90.8 एफएम

– सिल्व्हर: अपना रेडिओ 96.9 एफएम

-गोल्ड: बारह पाटणा कम्युनिटी रेडिओ

वाह उस्ताद चॅलेंज

– कांस्यपदक: संदीप मोहंती

-रौप्य: शालिनी

-सुवर्ण: आबाद अहमद

बॅटल ऑफ द बँड्स (इंडियन बँड्स)

– कांस्य: SOS

– रौप्य: सुफी रॉकर्स

– सुवर्ण : एकांतवासी

बॅटल ऑफ द बँड्स (आंतरराष्ट्रीय बँड्स)

– कांस्य: टीम फ्लो

– रौप्य: तीक्ष्ण

– सुवर्ण : फनकार्स

थीम संगीत स्पर्धा

– कांस्यपदक: टी. भावगणेश

– रौप्य: विवेक अविनाशचंद्र दुबे

– सुवर्ण : कुणाल कुंडू, आलाप सरदारा

रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज

-कांस्य : क्षितीज नागेश खोडवे

– रौप्य : मयंक हरीश विधानी

– सुवर्ण: श्रीकांत वेमुला

ॲनिमेशन श्रेणीतील विजेते

प्रस्तुतकर्ता: शेखर कपूर

अ‍ॅनिमेशन फिल्ममेकर स्पर्धा (अ‍ॅनिमेशन)

-कांस्यपदक: अनिका राजेश

-रौप्य : Elen Zee aur Pelixiano

– सुवर्ण: प्रतीक सेठी- इन्फॉर्मा मार्केट्स

चित्रपट श्रेणीतील विजेते

अभिनेते अनुपम खेर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

यंग फिल्ममेकर्स चॅलेंज (वय 12–15 वर्ष)

कांस्यपदक: हेमप्रभू भट्टाचार्य

– रौप्य : राब्या वाधवा, माही सलुजा

– सुवर्ण : सुप्रिया कुमारी, आदि आदि गोयल, आकाश खरवार

यंग फिल्ममेकर्स चॅलेंज (वय 16 – 18 वर्ष)

– रौप्य : छवी जैन, साक्षी शर्मा, अदिती पांडे, रचना यादव

– सुवर्ण : यशा कंसोटिया, दिव्यशक्ती सरोहा

चित्रपट पोस्टर मेकिंग स्पर्धा (डिजिटल)

– कांस्य: शिवांगी सरमा कश्यप

-रौप्य: सप्तसिंधू सेनगुप्ता

-सुवर्ण: सुरेश डी. नायर

चित्रपट पोस्टर मेकिंग स्पर्धा (हाताने रंगवलेले)

– कांस्य: प्रियदर्शिनी दास अधिकारी

– रौप्य: आदिशा ग्रोव्हर

– सुवर्ण: दृश्य अशोक