Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा

Waves Summit 2025 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्स समिटमध्ये सहभाग घेतला. कलाकारांच्या या मेळ्यात 90 हून अधिक देशांचे सेलिब्रिटी आणि व्यापारी, व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. जगभर या सोहळ्याची जोरदार चर्चा आहे.

Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा
वेव्स समिटी 2025
Image Credit source: गुगल
| Updated on: May 03, 2025 | 8:46 AM

मुंबईत सुरू असलेल्या Waves Summit 2025 ची सध्या जगभर चर्चा आहे. दुसऱ्या दिवशी जगातील कला प्रांतातील दिग्गजांनी या मेळ्यात सहभाग होत धमाल केली. 90 हून अधिक देशातील सेलिब्रिटी, प्रतिनिधींसमोर अनेक तरूण कंटेंट क्रिएटर्स यांना सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सोहळा संपूर्ण चित्रपट सृष्टीसाठी एक मोठी संधी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये वेव्स समिटचा दुसरा दिवस एकदम खास राहिला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे पण या कार्यक्रमात सहभागी झाले. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी देशात असा कार्यक्रम होणे ऐतिहासिक असल्याचे सांगत भारतीय चित्रपटांचा डंका आता जगभर गाजेल असे म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्स समिटमध्ये सहभाग नोंदवला. हा सोहळा केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या सोहळ्यात जगभरातील 90 हून अधिक देशांतील सेलेब्रिटी आणि व्यावसायिकांनी हजेरी लावणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी केले उद्धघाटन

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पहिले वेव्स समिट आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्धघाटन केले. वेव्स समिटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात भारत अधिक मजबूत स्थितीत आला आहे. वेव्स समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की भारतीय चित्रपटाकडे जगाला देण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत. हे समिट 4 दिवस चालणार आहे. या समिटमध्ये 90 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहे. यामध्ये जगभरातील कलाकार, स्टार्टअप, उद्योजक यांच्यासह व्यापारी, व्यावसायिक यांचा सहभाग होता. या सोहळ्यात हजारो क्रिएटर्स, कंपन्या आणि स्टार्टअप प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामुळेच या वेव्स 2025 ची टॅगलाईन कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज, अशी ठेवण्यात आली होती.

वेव्स समिटच्या दुसऱ्या दिवशी Youtube चे सीईओ नील मोहन हे सहभागी झाले. वेव्स सेमिनारमध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी या पण सहभागी झाल्या. लवकरच भारत कला, शिल्पाच्या माध्यमातून सौंदर्यशास्त्र आणि फॅशनच्या जगाला मार्गदर्शन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजून दोन दिवसात जगभरातील अनेक सेलिब्रिटी या महोत्सवात दिसतील.