अक्षय कुमार – रवीना टंडन यांचा साखरपुडा मोडून 22 वर्ष, अखेर अभिनेत्री म्हणाली, ‘काहीही बदललेलं नाही तो तर…’

आज पती - पत्नी असते अक्षय कुमार - रवीना टंडन, तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र कारण..., अभिनेत्री म्हणाली, 'काहीही बदलेलं नाही तो तर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय कुमार - रवीना टंडन यांचीच चर्चा...

अक्षय कुमार - रवीना टंडन यांचा साखरपुडा मोडून 22 वर्ष, अखेर अभिनेत्री म्हणाली, काहीही बदललेलं नाही तो तर...
अक्षय कुमार - रवीना टंडन
| Updated on: Jun 27, 2026 | 9:43 AM

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता अक्षय कुमार – अभिनेत्री रवीना टंडन यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असायची. दोघांचं नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचलं होतं. पण लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर अक्षय आणि रवीना कधीच एकत्र दिसले नाही. पण तब्बल 22 वर्षांनंतर अक्षय आणि रवीना मोठ्या स्क्रिनवर एकत्र दिसत आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमातून अक्षय आणि रवीना एकत्र आले आहेत. सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला असून सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे… एवढंच नाहीतर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, रवीना हिने अक्षय याच्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं आहे.

रवीना म्हणाली, ‘मला असं वाटतं की, अनेक वर्षांनतंर अक्षयसोबत काम करणं मजेदार आहे… त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. तो प्रचंड हार्डवर्किंग आणि डेडिकेटेड आहे… तो कायम त्याच्या कामात मग्न असतो आणि सेटवर त्याचं काम दिसतं… त्याला सर्व यश मिळूदे जे त्याला मिळायला हवं कारण तो खूप मेहनती आहे…’, असं अभिनेत्री म्हणाली,

अक्षय आणि रवीना यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. मोहरा, खिलाड़ियों का खिलाड़ी, दावा, कीमत आणि बारूद यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दोघांनी काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं होतं.

अक्षयने देखील केलं रवीनाचं कौतुक

सांगायचं झालं तर, ‘वेलकम टू द जंगल’च्या ट्रेलर लाँचदरम्यान जेव्हा अक्षयला रवीनासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला, “ती तेव्हाही अत्यंत प्रोफेशनल होती आणि आजही तशीच आहे. मला आठवतं, एकदा आम्ही एका सिनेमाचं शूटिंग करत होतो; सूर्यास्त जवळ आला होता आणि त्याआधीच आम्हाला शूटिंग पूर्ण करायचं होतं. ग्रीन रूम बरीच लांब होती, त्यामुळे कपडे बदलण्यासाठी तिथे जाऊन लगेच परत येणं शक्य नव्हतं. त्यावेळी रवीना थेट जनरेटर व्हॅनमध्ये गेली, तिथेच कपडे बदलले आणि परत आली; यामुळे सर्वांचाच वेळ वाचला. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.”

पुढे विनोदी अंदाजात अक्षय म्हणाला, ‘पण एक गोष्ट आहे, आधी ती हिरोईन होती आणि आता हिरोईनची आई आहे…’, अक्षय असं म्हणाला कारण, रवीना हिची लेक राशा थडानी हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Follow Us