AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तुला Kiss करू शकतो का ? हुमा कुरेशीला कोणी विचारला हा सवाल ?

Huma Qureshi Video : अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिच्या 'तरला' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचदरम्यान तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात तिला एक व्यक्ती किस करण्याची परवानगी मागत आहे.

मी तुला Kiss करू शकतो का ? हुमा कुरेशीला कोणी विचारला हा सवाल ?
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 06, 2023 | 10:29 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) ही लवकरच ‘तरला’ या चित्रपटात झळकणार आहे. प्रसिद्ध शेफ तरला दलाल (Tarla Dalal) यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात हुमा मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून तो पाहून सिनेसृष्टीतील मित्रमंडळी आणि चाहत्यांनी हुमाचे खूप कौतुक केले आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असून हुमा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचदरम्यान हुमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याचीही सध्या खूप चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हुमा कुरेशी ही मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचे माजी जज आणि होस्ट शेफ गॅरी मिइगन ( Gary Mehigan) सोबत दिसत आहे. हुमा आणि गॅरी दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी एकत्र आले होते, त्यावेळचा हा व्हिडीओ पाहून युजर्सने गॅरीचे खूप कौतुक केले आहे.

नक्की काय आहे त्या व्हिडीओमध्ये ?

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असलेल्या या इव्हेंमध्ये हुमा समोर आल्यावर गॅरी तिच्याशी बोलत होते. एकमेकांना अभिवादन करताना गॅरीने केलेल्या एका कृतीमुळे त्यांचे खूपच कौतुक होत आहे. हुमाला भेटल्यावर गॅरीने तिला Kiss करण्यापूर्वी तिची परवानगी मागितली. ऑस्ट्रेलियन शेफ गॅरीने हुमाला विचारले ‘आपण किस करणार आहोत का ? ‘ (we’re gonna kisss?). त्याच्या या प्रश्नांनंतर हुमानेही अतिशय नम्रतेने ‘हो’ म्हटले आणि त्यानंतरच गॅरीने तिच्या गालावर तिला किस केले. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून , तो पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या या परवानगी (consent) मागण्याच्या कृतीचे खूप कौतुक केले आहे.

तरला दलाल यांच्या भूमिकेत झळकणार हुमा

विशेष म्हणजे सुप्रसिद्ध शेफला भेटलेली हुमा ही सुद्धा आगामी चित्रपटात शेफच्याच भूमिकेत झळकणार आहे. तरला दलाल यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हुमा पहिल्यांदाच एखाद्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Gary Mehigan (@garymehigan)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.