शेफाली जरिवालाची शेवटच्या क्षणी कशी झालेली अवस्था, नवऱ्याने अखेर सोडलं मौन

Shefali Jariwala Death: 'ती इंजेक्शन घ्यायची...', शेफाली जरिवाला हिच्या एन्टी एजिंग ट्रीटमेंटवर नवऱ्याचं मोठं वक्तव्य, शेवटच्या क्षणी कशी झालेली अभिनेत्रीची अवस्था..., अभिनेत्रीच्या निधनानंतर नवऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर...

शेफाली जरिवालाची शेवटच्या क्षणी कशी झालेली अवस्था, नवऱ्याने अखेर सोडलं मौन
फाईल फोटो
| Updated on: Sep 26, 2025 | 12:54 PM

Shefali Jariwala Death: ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरिवाला हिचं 27 जून रोजी निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, वृद्धत्वविरोधी उपचारांमुळे अभिनेत्रीचं निधन झालं. आता, अभिनेत्रीच्या मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर, अभिनेता पराग त्यागी याने शेफाली हिच्या मृत्यूनंतर पसरलेल्या अफवांवर मौन सोडलं आहे.

शेफाली जरिवाला हिच्या मृत्यूबद्दल पराग म्हणाला, ‘शेफालीने एन्टी एजिंग इंजेक्शन घेतली नव्हती…’, चर्चांनुसार, अभिनेत्री रिकाम्या पोटी एन्टी एजिंग इंजेक्शन घेतले होते. ज्यामुळे तिला हृदयविकाराची झटका आला. पण आता पराग त्यागी याने केलेल्या दाव्यानुसार, शेफाली हिने कधीच एन्टी एजिंग इंजेक्शन घेतलं नव्हतं.

अफवांवर पराग त्यागी म्हणाला, ‘ती दररोज तिचं मल्टीविटामिन घेणं विसरायची. ती महिन्यातून एकदा आयव्ही ड्रिपद्वारे ते घ्यायची. व्हिटॅमिन सी, कोलेजन, ग्लूटाथिओन आणि इतर काही उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट्ससह हे जीवनसत्त्वे त्यात समाविष्ट होते.’

 

 

शेफालीच्या मृत्यूच्या दिवशी तिचा उपवास होता. पण पराग त्यागी याने केलेल्या दाव्यानुसार, 27 जून रोजी तिचा उपवास होता. पण पूजा झाल्यानंतर ती जेवली होती. ती पूर्ण दिवस उपाशी नव्हती… शेफालीच्या तरुण लूकबद्दल बोलताना पराग त्यागी म्हणाले की, शेफाली कायम स्वतःच्या शरीरावर काम करायची म्हणून ती सुंदर आणि तरुण दिसत होती.

शेफाली हिच्या शेवटच्या क्षणांबद्दल देखील अभिनेत्याने भावुक होत खुलासा केला. शेफालीची प्रकृती खालावल्यानंतर तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. एक – दोन वेळा तिने श्वास देखील घेतला. ती तळमळत होती, तिचे डोळे बंद होते आणि शारीराने साथ सोडली होती…

पराग त्यागी पत्नी शेफाली जरीवालाच्या मृत्यूला आयुष्यातील सर्वात भयानक रात्र म्हणतो. अभिनेता म्हणतो, ती रात्र कधीही विसरणार नाहीत. आपण आयुष्यात खूप योजना आखतो, पण आयुष्य एका क्षणात बदलतं… असं देखील अभिनेता म्हणाला…

Follow Us