AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकरी ईदच्या आधी या देशात ‘Trump’ आणि ‘Netanyahu’ या कारणाने फेमस, लोक घेताहेत सेल्फी

बांगलादेशात ईद-उल-अजहा आधीच दोन रेडे सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. लोकांनी त्यांचे नाव डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू ठेवले आहे. त्यांच्या विशिष्ट लुकमुळे ते चर्चेत आहेत.

बकरी ईदच्या आधी या देशात 'Trump' आणि 'Netanyahu' या कारणाने फेमस, लोक घेताहेत सेल्फी
Buffaloes called 'Trump' and 'Netanyahu'
| Updated on: May 17, 2026 | 8:06 PM
Share

बांगलादेशात ईद-उल-अजहाची तयारी सुरु असतानाच या दोन म्हशी सोशल मिडीयात जबरदस्त चर्चेचा विषय बनल्या आहेत. या म्हशींची खासीयत केवळ त्यांचे वजनदार शरीर नसून तर त्यांचा चेहरा आणि स्वभाव आहे. या म्हशींना जगातील दोन मोठ्या नेत्यांशी जोडले जात आहे. याचे कारण हे आहे की यांचे नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी जोडले जात आहे.

ढाका येथील तब्येलात या दोन म्हशींना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. लोक त्यांच्या सोबत फोटो आणि सेल्फी काढत आहेत. तर सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

येथे पोस्ट पाहा –

बांगलादेशातील प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प नावाच्या रेड्याचे वजन ७०० किलो आहे. त्याची त्वचा आणि सोनेरी रंगाच्या केसांमुळे लोक त्याला ट्रम्प नावाने संबोधत आहे.अनेक व्हिजिटर्स मजेत म्हणत आहेत की त्याचा रंग जरी ट्रम्प यांच्या सारखा असला तरी त्याचा स्वभाव अगदी विरोधाभासी शांत आणि नम्र आहे.

या वजनदार रेड्याचे मालक जियाउद्दीन यांनी सांगितले की त्याला ‘ट्रम्प’ हे नाव त्यांच्या लहान भावाने ठेवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की अल्बिनो रेडे हे जोपर्यंत त्यांना त्रास दिला जात नाही तोपर्यंत शांत असतात. बकरी ईदच्या आधीच हा ‘ट्रम्प’ विकला गेला आहे.

येथे पोस्ट पाहा –

दुसरीकडे ‘बेंजामिन नेतन्याहू’ नावाचा अन्य एक रेडा देखील इंटरनेटवर खूपच चर्चेत आहे. हा रेडा ७५० किलोहून जास्त वजनाचा असल्याचे म्हटले जात आहे. त्याचा स्वभाव आधीच्या ‘ट्रम्प’ पेक्षा एकदम वेगळा आहे.

फार्मशी संबंधित लोकांच्या मते हा नेतान्याहू नावाचा रेडा खूपच आक्रमक आहे. तो नेहमीच मोठ्याने आवाज काढतो. अचानक हँडलर्सकडे वेगाने धावत जातो आणि त्याचे वागणे खूपच अनपेक्षित असते. एका फार्म मॅनेजरने मस्करीत सांगितले की या रेड्याचे डोके कुरापती आहे, ज्याच्यामुळे लोकांचा इंटरेस्ट आणखीन वाढला आहे.

ईद जवळ आली असताना दोन्ही रेडे बांगलादेशात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर लोक यांच्या विषयी चर्चा करत आहे. खरोखरच यांचा चेहरा आणि वागणं या रेड्यांशी जुळतोय की हा केवळ योगायोग आहे. कारण कोणतेही असो परंतू या दोन्ही रेड्यांनी यावेळी बकरी ईदच्या आधी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Follow Us
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण..
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण...
कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा..
कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा...
अजित पवारांनंतर अर्थखात्याचा तिढा, हसन मुश्रीफांचा मोठा दावा.....
अजित पवारांनंतर अर्थखात्याचा तिढा, हसन मुश्रीफांचा मोठा दावा......
मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट...
मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट....
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी.
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज.
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?.
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'..
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'...
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक.