AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घरात साप आला तर ही चूक कधीच करू नका, बँक बॅलन्स होईल खाली, घरात येते गरिबी

वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मामध्ये सापाला प्रगती आणि अध्यात्मिक विकासाचं प्रतिक मानलं जातं. जर तुमच्या घरात साप आला असेल तर तो एक शुभ संकेत असतो, असंही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. मात्र जेव्हा एखाद्याच्या घरात साप निघतो, तेव्हा आपण भीतीपोटी काही चुका करतो, त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते.

Vastushastra : घरात साप आला तर ही चूक कधीच करू नका, बँक बॅलन्स होईल खाली, घरात येते गरिबी
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 8:18 PM
Share

उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यामध्ये जमीन गरम झाल्याने सापांना उष्णतेचा त्रास होतो, आणि साप बिळातून बाहेर पडतात. साप मुळातच थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. अशावेळी ते लपण्यासाठी थंड आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. त्यामुळे अनेकदा अशा जागेचा शोध घेत असाताना ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पंदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. जेव्हा एखाद्या घरामध्ये साप निघतो, तेव्हा तो अनेकदा योगायोग असतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात साप दिसणं हे एक शुभ लक्षण मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये सापाला प्रगती आणि अध्यात्मिक विकासाचं प्रतिक मानलं गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात साप निघतो, तेव्हा त्याचा अर्थ असा की, लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत, ते तुम्हाला होणाऱ्या धन प्राप्तीचे देखील योग असतात. सोबतच तुमचा प्रवास हा अध्यात्मिक विकासाकडे सुरू झाला आहे, याचे देखील ते संकेत असतात. परंतु सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैर समज असतात, त्यामुळे आपण साप दिसला की त्याला लगेच मारतो, मात्र असं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी ते सापाला रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी सोडतील.

तुमच्या घरात जर साप उत्तर दिशेकडून निघाला असेल तर तो अत्यंत मोठा संकेत असतो. लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. तुमचं नशीब चमकणार आहे. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये मोठा फयदा होणार आहे, याचा तो संकते असतो. तसेच जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अध्यात्माच्या दिशेनं प्रवास सुरू झालेला असतो, तेव्हा देखील असा संकेत तुम्हाला मिळू शकतो. हिंदू धर्मामध्ये सापाला अध्यात्माच्या क्षेत्रात मोठं महत्त्व आहे. भगवान महादेव यांच्या गळ्यात देखील साप आहे. तसेच भगवान विष्णू हे शेष नागावर बसलेले आहेत. नागपंचमीच्या दिवशी आपण नागांची पूजा करतो.

मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी वास्तुशास्त्र तसेच निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी देखील ही गोष्ट महत्त्वाची आहे. घरात जेव्हा साप निघतो, तेव्हा त्याला कधीही मारू नका, तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या. सर्पमित्र त्या सापाला रेस्क्यू करतील. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा सापाला मारतात, तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग तयार होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तुमचं घर आर्थिक दृष्या देखील अस्थिर बनतं. तसेच सापांना मारल्यास पितृदोष देखील निर्माण होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...