राखी सावंत नाही… ‘हे’ आहे ड्रामा क्वीनचं खरं नाव, 90 % लोकांना नसेल माहिती

Rakhi Sawant Real Name: राखी सावंत नाही तर, काय आहे ड्रामा क्वीनचं खरं नाव... आईच्या दुसऱ्या लग्नानंतर बदललं राखीचं आयुष्य... 90 % लोकांना नसेल माहिती तिचं खासगी आयुष्य..., सध्या सर्वत्र राखी सावंत हिची चर्चा...

राखी सावंत नाही... हे आहे ड्रामा क्वीनचं खरं नाव, 90 % लोकांना नसेल माहिती
| Updated on: Nov 25, 2024 | 10:55 AM

Rakhi Sawant Real Name: जेव्हा – जेव्हा राखी सावंत हिची चर्चा रंगते तेव्हा सर्वांच्या मनात एकच नाव येतं आणि ते म्हणजे ‘ड्रामा क्वीन’… सांगायचं झालं तर, राखीने बॉलिवूडमध्ये स्वतःची अत्यंत वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी राखी कायम काही न काही तरी करत असते. ज्यामुळे राखीला वादग्रस्त परिस्थितींचा देखील सामना करावा लागतो. वादग्रस्त परिस्थिती आणि राखी सावंत यांचं फार जवळचं नातं आहे. आज तिला प्रत्येक जण राखी सावंत या नावाने ओळखतो… पण अभिनेत्रीचं खरं नाव फार कोणाला माहिती देखील नाही. शिवाय तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील फार कोणाला माहिती नाही.

आज राखी सावंत हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र तिची चर्चा रंगली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की राखीचं फक्त नावच नाही तर तिचं आडनाव देखील वेगळे होते. राखीचं नाव नीरु भेडा असं होतं. राखीची आई जया भेडा यांच्या दुसऱ्या लग्नानंतर राखीने देखील स्वतःचं नाव बदललं.

मिळालेल्या माहितीनुसार, राखीची आई जया भेडा यांनी कॉन्स्टेबल आनंद सावंत यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. आईच्या दुसऱ्या लग्नानंतर राखीने देखील स्वतःच्या नावापुढे दुसऱ्या वडिलांचं आडनाव लावण्यास सुरुवात केली. राखीने तिच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. पण आज राखीला कोणत्याच ओळखीची गरज नाही.

 

 

शालेय शिक्षण सुरु असताना राखी हिने फिल्मी दुनियेत स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला होता, परंतु तिला अनेकदा नकारांचा सामना करावा लागला. अशात राखीने कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा निर्यण घेतला. त्यानंतर राखीला अनेक ऑफर आल्या.

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निचक्र’ सिनेमातून राखीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यानंतर 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बत है मिर्ची’ सिनेमामुळे राखीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अनेक सिनेमांमध्ये राखीने छोट्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय 2006 मध्ये ‘बिग बॉस’ मध्ये देखील दमदार स्पर्धक म्हणून राखीने स्वतःची ओखळ निर्माण केली. आता राखीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.