AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar Real Name: क्वचितच कोणाला माहिती असेल नाना पाटेकर यांचे खरे नाव काय?

Nana Patekar Real Name: संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांचे खरे नाव क्वचितच कोणाला माहिती असेल. तसेच त्यांचे संपूर्ण शिक्षण हे मुंबईतून झाले होते.

Nana Patekar Real Name: क्वचितच कोणाला माहिती असेल नाना पाटेकर यांचे खरे नाव काय?
Nana Patekar Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 8:48 AM
Share

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे आज 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराने नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली आहे. सिनेमांबरोबरच नाना हे आपल्या परखड वक्तव्यांमुळेही नेहमीच चर्चेत होते. संपू्र्ण देशात नाना म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांचे खरे नाव काय होते? तुम्हाला माहिती आहे का?

नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील रायगड येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर आहे. हे नाव फार थोड्या लोकांना माहीत आहे. त्यांचे वडील गजानंद पाटेकर व्यापारी होते, तर आई निर्मला पाटेकर गृहिणी होत्या. नाना पाटेकर यांना अशोक आणि दिलीप पाटेकर असे दोन भाऊ आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव नीलकंती पाटेकर असून त्या बँक अधिकारी होत्या. नाना पाटेकर यांना दोन मुले, मात्र त्यापैकी एका मुलाचे दुर्दैवाने निधन झाले.

नाना पाटेकर यांचे खरे नाव?

शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर नाना पाटेकर यांनी मुंबईत राहून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांची शाळा समर्थ विद्यालय होती. त्यानंतर त्यांनी वांद्रे स्कूल ऑफ आर्टमध्ये (आताचे एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट) शिक्षण घेतले आणि सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतली आहे.

फिल्मी करिअर

चित्रपट क्षेत्रात नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये ‘गमन’ या सिनेमातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या अभिनयाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान त्यांच्या नावावर आहेत.

नाना पाटेकर यांच्या निधनाचे कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!