लग्न, आई होण्याबाबतच्या प्रश्नावर 21 वर्षीय ऐश्वर्या रायने काय उत्तर दिलं होतं? जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

एकवीस वर्षीय ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या लग्नाविषयी आणि आई होण्याबाबतच्या प्रश्नाविषयी उत्तर देताना दिसून येत आहे. तिच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लग्न, आई होण्याबाबतच्या प्रश्नावर 21 वर्षीय ऐश्वर्या रायने काय उत्तर दिलं होतं? जुना व्हिडीओ तुफान व्हायरल
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 11:38 AM

अभिनेत्री ऐश्वर्या रायचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला. 19 नोव्हेंबर 1994 रोजी तिने ‘मिस वर्ल्ड’ या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचा किताब जिंकला होता. ऐश्वर्याच्या सौंदर्याची भुरळ आजही चाहत्यांना पडते. ऐश्वर्याचे सध्याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. अशातच तिच्या एका जुन्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ती 21 वर्षांची असतानाचा हा व्हिडीओ असून एका मुलाखतीत तिला लग्न आणि मुलाबाळांविषयी तुझे काय विचार आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्याने दिलेलं उत्तर आणि तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या गुलाबी रंगाच्या साडीत दिसून येत आहे. त्यावर तिने गोल्ड आणि पर्लची ज्वेलरी परिधान केली आहे. एका मुलाखतीत तिला लग्नाविषयी प्रश्न विचारला जातो. त्यावर ती हसत म्हणते, “हा प्रश्न कोणी विचारला आहे? होय, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि जेव्हा मी योग्य व्यक्तीला भेटेन, तेव्हा नक्कीच लग्न करेन. म्हणूनच मी आधी विचारलं की कोणी हा प्रश्न विचारलाय? तुम्ही हात वर करा. अर्थातच मी एकेदिवशी लग्न नक्कीच करेन. मला वैवाहिक आयुष्य आणि मातृत्व यांचा अनुभव घ्यायचा आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा मी याबद्दलचा निर्णय घेईन.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by 90sedits (@getedits1)

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तेव्हा ती फक्त 21 वर्षांची होती’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तिच्या मुलीचा आवाज अगदी तिच्यासारखाच आहे. वयाच्या 21 व्या वर्षीही ऐश्वर्या प्रचंड आत्मविश्वासू दिसत आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी कमेंट्समध्ये ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. यावरून नेटकऱ्यांनी अभिषेकला ट्रोल केलंय.

अभिषेक आणि ऐश्वर्याने 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली. तर 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. मात्र या दोघांनी अद्याप त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. नुकतंच ऐश्वर्या आणि आराध्या यांना ‘जलसा’ बंगल्याबाहेर पाहिलं गेलं.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.