
Shahrukh Khan Viral Video : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख (Shahrukh Khan) हा सर्वांच्याच हृदयात वसलेला आहे. अनेक वर्ष कठोर मेहनत करून त्याने आजचे यश, हे सुपरस्टारपद कमावले आहे. त्याचे लाखो फॅन्स असून सहकलाकारही त्याचं कौतुक करत असतात. त्याने चित्रपचाप्रमाणेच रिॲलिटी शोचा होस्ट म्हणूनही काम केलं आहे. शाहरुखने ‘कौन बनेगा करोड़पति 3’ सीझनही होस्ट केला होता.
मात्र त्या शो दरम्यान असं काही झालं होतं, जे आजपर्यंत कोणीच विसरू शकलेलं नाही. खरंतर, त्या शोदरम्यान हॉटसीटवर बसलेल्या एका महिला स्पर्धकाने शाहरुखला चांगला अभिनेता मानण्यास नकार दिला होता. त्या महिलेनेही शाहरुखला मिठी मारण्यास नकार दिला. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यावर शाहरुखची जी प्रतिक्रिया होती, ती सर्वांनाच लक्षात राहिली.
मला तू चांगला अभिनेता वाटत नाहीस
शाहरुखचा हा जुना व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यात केबीसी ३ मध्ये पोहोचलेली एक स्पर्धक शाहरुखशी बोलत होती. ‘मी तुझे चित्रपट बघितले आहेत, पण मला तू फारसा चांगला अभिनेता वाटत नाहीस. मला तुला (इथे) भेटण्याची फारशी इच्छा नव्हती ‘ अशा जरा जास्तच स्पष्ट शब्दांत त्या महिला स्पर्धकाने शाहरुखला सुनावले होते. तिचा तो स्पष्टवक्तेपणा पाहुन सर्वच अवाक् झाले. तेव्हा शाहरुखने फारशी प्रतिक्रिया तर दिली नाही, पण तो थोडा निराश झाल्यासारखा दिसत होता.
नंतर काय होतं शाहरुखचं उत्तर ?
त्यावेळी शाहरुख खान काही बोलला नाही, मात्र त्या महिलेने गेममध्ये ठराविक रक्कम जिंकल्यावर शाहरुखने तो चेक तिला देण्याऐवजी तो तिच्या आईला दिला. रक्कम जिंकल्यानंतर शाहरुख त्या महिलेला म्हणाला, ‘ तुमची हरकत नसेल तर मी माझ्या वतीने हा चेक तुझ्या आईला दिला तर चालेल ना, कारण ती नक्कीच मला मिठी मारेल.’ त्या महिलेने शाहरुखच्या विधानाशी सहमती दर्शवली. त्याा हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला आहे.
कामाबाबत बोलायचे झाले तर शाहरुख सध्या 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जवान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच तो या ‘डंकी’ या पुढच्या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण करत आहे.