फ्लॉप चित्रपटांना वैतागून अभिषेकने घेतला होता मनोरंजन विश्वाचा निरोप घेण्याचा निर्णय, मग अमिताभ म्हणाले…

फ्लॉप चित्रपटांना वैतागून अभिषेकने घेतला होता मनोरंजन विश्वाचा निरोप घेण्याचा निर्णय, मग अमिताभ म्हणाले...
अभिषेक आणि अमिताभ बच्चन

'रिफ्युजी' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द बिग बुल' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 12, 2021 | 12:55 PM

मुंबई : ‘रिफ्युजी’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द बिग बुल’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. हा चित्रपट 1992चा शेअर मार्केट घोटाळा आरोपी हर्षद मेहता याच्या जीवनावर आधारित आहे. ‘द बिग बुल’ मधील अभिषेकच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण, अभिषेकच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा तो बॉलिवूडमधून निरोप घेण्याच्या तयारीत होता (When Abhishek Bachchan wants to quite film industry actor share story of struggle).

होय, अभिषेकने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, एका माणसाच्या सल्ल्यामुळे त्याने इतके मोठे पाऊल उचलणे टाळले. ती व्यक्ती इतर कोणी नव्हती तर, ते होते त्याचे वडील अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांच्या या सल्ल्यामुळे अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत ‘धूम’ फ्रेंचायझी, ‘गुरू’, ‘पा’ आणि ‘बोल बच्चन’ या चित्रपटांसह इंडस्ट्रीला काही संस्मरणीय चित्रपट दिले.

वडिलांच्या सल्ल्याने वाचली अभिषेकची कारकीर्द

नुकतेच एका मुलाखतीत अभिषेक बच्चन याने याविषयी भाष्य केले होते. यावेळी त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीत न राहण्याचा निर्णय घेतला तेव्हाचा दिवस आठवला. अभिषेक बच्चन म्हणाला की, सार्वजनिक व्यासपीठावर अपयशी होणे फार कठीण गोष्ट आहे. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, परंतु मी माध्यमांद्वारे असे वाचत होतो की लोक मला शिवीगाळ करतात आणि असे म्हणतात की, मला अभिनय माहित नाही.’(When Abhishek Bachchan wants to quite film industry actor share story of struggle)

तो म्हणाले की, एक काळ असा आला की, जेव्हा मी चित्रपटसृष्टीत आलो तेव्हा ही माझी चूक आहे असे मला वाटू लागले. तथापि, मी प्रयत्न करत होतो. परंतु, हाती काहीही काम नव्हते. मी वडिलांकडे गेलो आणि म्हणालो की, कदाचित मी या उद्योगासाठी बनलेलोच नाही. अभिषेक पुढे म्हणाला की, त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याला सांगितले की, तुम्ही हार मानावी अशा रीतीने मी तुला मोठे केले नाही. सूर्या प्रमाणे तळपण्यासाठी दररोज सकाळी आपल्याला उठून आपल्याला संघर्ष करावा लागतो. अभिनेता म्हणून तू प्रत्येक चित्रपटात चांगले काम करत आहेस.

काय होता बिग बींचा सल्ला?

यानंतर अमिताभ यांनी अभिषेकला असा सल्ला दिला की, खूप विचार करून भूमिका निवड आणि तुझ्या  कामावर लक्ष केंद्रित कर. वडील अमिताभ बच्चन यांचा हाच सल्ला अभिषेकच्या हृदयात घर करून राहिला. यामुळेच त्याने बॉलिवूड सोडण्याची कल्पना आपल्या मनातून काढून टाकली. याचाच परिणाम म्हणजे अभिषेक बच्चन आता केवळ चित्रपटांतच नव्हे तर ओटीटीच्या व्यासपीठावरही स्वत:ला सिद्ध करून दाखवत आहे!

(When Abhishek Bachchan wants to quite film industry actor share story of struggle)

हेही वाचा :

Sharvani Pillai | अभिनेत्री शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग, ‘माऊची लाडकी आई करणार नव्या क्षेत्रात पदार्पण!

Video | वर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवलं कतरिना कैफचं गाणं, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें