
मुंबई | सध्या सर्वत्र बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेलं एक वक्तव्य तुफान चर्चेत आहे. निर्माते शेखर कपूर यांची पहिली पत्नी सुचित्रा कृष्णमूर्ती (suchitra krishnamoorthi) एकदा म्हणाली होती की तिला दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत लग्न करायचं होतं. अभिनेत्रीने व्यक्त केलेली मनातील गोष्ट ऐकून वर्मा प्रचंड घाबरले होते. एवढंच नाही तर, राम गोपाल वर्मा यांनी सचित्रा कृष्णमूर्ती हिला स्वतःच्या ऑफिसमध्ये देखील बोलावलं होतं. पण तेव्हा घडलेली एक गोष्ट आज अनेक वर्षांनंतर समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र सुचित्रा कृष्णमूर्ती आणि राम गोपाल वर्मा यांची चर्चा रंगत आहे.
सुचित्राने तिच्या आत्मचरित्रात राम गोपाल वर्मांना मेसेज पाठवल्याचा उल्लेख केला आहे. ‘तू माझ्यासोबत लग्न करशील का?’ असा मेसेज सुचित्रा हिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना पाठवला होता. सुचित्रा आणि राम गोपाल वर्मा यांनी ‘माय वाईफ्स मर्डर’ आणि ‘रण’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हा सुचित्रा हिने दिग्दर्शकाला लग्नासाठी मागणी घातली होती. ( ram gopal varma)
पण सुचित्रा यांनी केलेली लग्नाची मागणी राम गोपाल वर्मा यांनी फेटाळून लावली. एवढंच नाही तर दिग्दर्शक म्हणाले, ‘मी महिलांचा वापर फक्त इंटिमेसीसाठी करतो. मला महिलांचं शरीर आवडतं. मला महिलांना फक्त पहायलं आवडतं, त्यांना ऐकायला नाही.. म्हणून तू माझ्यापासून शक्य तितकं दूर राहा…’ (entertainment news)
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा यांनी सांगितलं की, तेव्हा मस्करी केली होती. पण राम गोपाल वर्मा यांनी गांभीर्याने घेतलं होतं. ‘तेव्हा फक्त मी मस्करी केली होती. राम गोपाल वर्मा यांच्यासोबत कोण लग्नाचा विचार करु शकतं? ते अत्यंत उत्तम व्यक्ती आहेत. पण माझ्या एका मेसेजमुळे ते घाबरले होते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी मेसेज केल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हणाले, ‘तू एक चांगली मुलगी आहे आणि मी वाईट व्यक्ती आहे. मी त्यांच्याबद्दल विचार करायला नको…’यासाठी मला ते समजावत होते.’ अखेर अभिनेत्रीने ही केवळ मस्करी असल्याचं राम गोपाल वर्मा यांना सांगितलं. सध्या सर्वत्र राम गोपाल वर्मा आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांची चर्चा रंगत आहे. राम गोपाल वर्मा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.