धर्मेंद्र यांनी जेव्हा इस्लाम धर्म स्विकारला तेव्हा त्यांचे मुस्लिम नाव काय होते? 99% लोकांना माहित नसेल

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. हिंदू विवाह कायद्यानुसार पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणे अशक्य होते. त्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला होता. पण जेव्हा इस्लाम धर्म स्विकारल्यानंतर, म्हणजे धर्मांतरानंतर धर्मेंद्र यांचे नाव बदलून मुस्लिम धर्मानुसार त्यांचे नाव ठेवण्यात आले होते. ते नाव काय होते हे अनेकांना माहित नसेल.

धर्मेंद्र यांनी जेव्हा इस्लाम धर्म स्विकारला तेव्हा त्यांचे मुस्लिम नाव काय होते? 99% लोकांना माहित नसेल
When Dharmendra converted to Islam, his name was changed to Dilawar Khan
Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao | Updated on: Nov 25, 2025 | 6:51 PM

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र आपल्यात नाहीत, बॉलिवूडच्या या सुपरस्टारने 24 नोव्हेंबर रोजी सकाळी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अंतिम संस्कार अतिशय खाजगी पद्धतीने केले. त्यांच्या निधनानंतर, अनेक प्रमुख बॉलिवूड स्टार्स आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांना भेटायला देखील जात आहे.

धर्मेंद्र चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत राहिले

धर्मेंद्र यांनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं आहे. धर्मेंद्र चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील तेवढेच चर्चेत राहिले आहेत विशेषत: हेमा मालिनी यांच्याशी केलेल्या दुसऱ्या लग्नाबद्दल. त्यांचे हेमा मालिनी यांच्यावर जेव्हा प्रेम जडले तेव्हा ते आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहित होते. त्यांना मुले देखील होती. त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे त्यांच्या पहिल्या लग्नात अनेक अडचणी देखील आल्या होत्या.

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणे अशक्य होते

धर्मेंद्र यांनी सगळ्या अडचणींचा सामना करत हेमा यांच्याशी लग्न केले. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर होत्या आणि त्यांची दुसरी पत्नी बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी होत्या. 1979 मध्ये जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या एका परिस्थितीचा सामना करावा लागला. हिंदू विवाह कायद्यानुसार, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणे अशक्य होते.

हेमा यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला, नावही बदलले

केवळ लग्नासाठी त्यांना त्यांचा धर्म बदलावा लागला. त्यांनी या आव्हानादरम्यान, इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण त्यावेळी त्यांनी फक्त धर्मच स्वीकारला नव्हता तर त्यांचे नावही बदलेल होते. इस्लाम धर्मानुसार त्यांचे नाव बदलून दिलावर खान असे नाव ठेवण्यात आले होते. कागदपत्रावर याच नावाने त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. या काळात, सरकारी नोंदींमध्ये हेमा यांचे नाव आयेशा बी म्हणून देखील नोंदवण्यात आले होते.

धर्मेंद्र यांच्या निर्णयामुळे त्याकाळी धक्का बसला होता

धर्मेंद्र यांच्या निर्णयामुळे त्याकाळी त्यांच्या चाहत्यांसाठी आणि माध्यमांसाठी ही नक्कीच धक्कादायक बातमी होती, परंतु धर्मेंद्र आणि हेमा यांनी शांततापूर्ण वैयक्तिक जीवन जगले. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे स्थान आणखी मजबूत केले. धर्मेंद्र यांच्या जाण्याने मात्र आज सर्वच बॉलिवूड धक्क्यात आहे.

 

 

 

Follow Us