AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा दर्जा, तरी आयुष्यभर कशा आनंदी राहिल्या हेमा मालिनी? खंत व्यक्त करत म्हणाल्या…

Dharmendra Death : 'आयुष्यात सर्वकाही नाही मिळत म्हणून...', कायम दुसऱ्या पत्नीचा दर्जा, वैवाहिक आयुष्यात तडजोड... तरीही आयुष्यभर कशा आनंदी राहिल्या हेमा मालिनी? खंत व्यक्त करत म्हणाल्या...

Dharmendra Death :  धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा दर्जा, तरी आयुष्यभर कशा आनंदी राहिल्या हेमा मालिनी? खंत व्यक्त करत म्हणाल्या...
Dharmendra
| Updated on: Nov 25, 2025 | 2:45 PM
Share

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल काही वेगळं सांगायला नको. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फत्त धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. समाजाच्या विरोधात दोघांनी लग्न केलं आणि त्यांच्या लग्नाबद्दल फार कोणाला काही माहिती देखील नव्हतं. पण धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांना कायम दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांसोबत देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत. हेमा मालिनी यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलं होतं… काही गोष्टांचा आजही पश्चाताप होतो… असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.

एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मनातील खंत व्यक्त केली होती. हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘आयुष्यात मला जे काही हवं होतं ते मला मिळालं नाही… ‘मी असं म्हणणार नाही की आनंदी आणि सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या. तरुण वयात प्रत्येक जण परफेक्ट आयुष्याचे स्वप्न पाहत असतो. पण आपल्याला जे हवं ते कधीच मिळत नाही.. हे कटु सत्य आहे आणि त्याचा काहीही अर्थ नाही…’

सवत असल्यामुळे वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्या का? असा प्रश्न देखील हेमा मालिनी यांना विचारण्यात आला होता. यावर नकार देत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला असं कधी काही वाटलंच नाही… याच कारणामुळे मी आज आनंदी आहे… प्रेमात तुम्ही कायम समोरच्याचं मन सांभाळत असता.

कोणत्या अपेक्षा नसतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता आणि अखेर त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला फक्त प्रेम मिळतं. अपेक्षा नसतील तर छोट्या – छोट्या गोष्टींमुळे आयुष्यात अडचणी येत नाहीत..एक व्यक्ती म्हणून काही गोष्टींचा आजही पश्चाताप होत आहे, पण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा त्यांचा विचार करते, त्यांच्या भावनांचा विचार करते, तेव्हा सगळं काही ठिक वाटतं. त्यांची अनुपस्थिती देखील… ‘ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.