
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र अनेक नव्या सेलिब्रिटींच्या प्रेरणा स्थानी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत होते. बॉलिवूडमध्ये काम करत असताना धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगू लागल्या. धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याच्या चर्चा तर आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण झगमगत्या विश्वात पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यावर नाही तर, दुसऱ्याच अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम केलं होत. फिल्मी विश्वातील धर्मेंद्र यांचं ते पहिलं प्रेम होतं असं म्हणायला हरकरत नाही. ज्या अभिनेत्रीवर धर्मेंद्र जीवापाड प्रेम करत होते, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री मीना कुमारी होत्या.
मीना कुमारी यांचं निधन झालं आहे. सांगायचं झालं तर, मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. धर्मेंद्र यांना मिळालेल्या यशामध्ये देखील मीना कुमारी यांचा मोलाचा वाटा आहे. कारण तेव्हा मीना कुमारी यशाच्या शिखरावर होत्या. तर धर्मेंद्र झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होते.
दरम्यान, मीना कुमारी यांच्या अटीमुळे अनेक सिनेमांमध्ये निर्माते आणि दिग्दर्शकांना धर्मेंद्र यांना मुख्य अभिनेता म्हणून भूमिका द्यावी लागली. मीना कुमारी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असल्यामुळे निर्माते देखील नकार देऊ शकत नव्हते. अशाप्रकारे धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांनी ‘पूर्णिमा’, ‘काजल’, ‘फूल और पत्थर’, ‘मंझली दीदी’ आणि ‘बहारों की मंजिल’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. याच दरम्यान, मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली.
मीना कुमारी यांच्यासोबत काम करताना धर्मेंद्र यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. धर्मेंद्र यांना अनेक सिनेमांसाठी ऑफर येऊ लागल्या. चाहत्यांमध्ये धर्मेंद्र यांची क्रेझ वाढत होती. अनेक सिनेमांमध्ये काम मिळाल्यामुळे धर्मेंद्र व्यस्त झाले.
धर्मेंद्र सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाल्यानंतर मीना कुमारी आणि अभिनेत्यामध्ये दुरावा निर्माण झाला. रिपोर्टनुसार, अनेक दिवसांनंतर एका पार्टीमध्ये धर्मेंद्र आणि मीना कुमारी आमने – सामने आले होते. पण तेव्हा धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्यासोबत एक शब्द देखील बोलले नाहीत. त्या पार्टीनंतर मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं.