AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना कैफचं प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ब्रेकअप, म्हणाली होती, ‘ते ब्रेकअप माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद…’

Katrina Kaif on her Breakup: 'ते ब्रेकअप माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद...', प्रसिद्ध अभिनेत्यासोबत नातं मोडल्यानंतर कतरिना कैफने केलेलं मोठं वक्तव्य, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत कतरिना कैफ हिच्या नावाची चर्चा...

कतरिना कैफचं प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ब्रेकअप, म्हणाली होती, 'ते ब्रेकअप माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद...'
| Updated on: Aug 24, 2024 | 3:41 PM
Share

अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. कतरिना हिने स्वतःच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता कतरिना अभिनेता विकी कौशल याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा कतरिना हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता सलमान खान आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत कतरिना हिच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. कतरिना हिने सलमान खान याच्यासोबत असलेलं नातं कधीच मान्य केलं नाही. पण रणबीर कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीने मौन सोडलं होतं. रणबीर आणि कतरिना यांनी जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केलं. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. पण रणबीर – कतरिना यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला…

एका मुलाखतीत कतरिना कैफ हिने रणबीर कपूर याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपवर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘ती एक अशी वेळ होती, जेव्हा मी फक्त स्वतःवर लक्ष केंद्रीत केलं. मी जाणीव झाली की, मी स्वतःला ओळखते का? ती वेळी माझ्यासाठी मला ओळखण्यासाठी होती.’

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

‘माझ्यासोबत माझ्या एका बहिणीवर देखील अशी परिस्थिती ओढावली होती. त्यामुळे मला तिची मदत झाली. गोष्टींमध्ये झालेले बदल मी स्वतः ओळखू शकली. मला कळून चुकलं होतं की, तो माझा सन्मान होता आणि ज्याला ठेच लागली होती. ते ब्रेकअप मी कायम देवाचा आशीर्वाद समजेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एका मुलाखतीत कतरिना म्हणाली होती, ‘रणबीर आणि मी अद्यापही एकमेकांचा सन्मान करतो. कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नाही… जे झालं ते चांगलं झालं, माझ्यामध्ये आणखी समज आली आहे.’ सांगायचं झालं तर, रणबीर – कतरिना यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. दोघे आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

कतरिना हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात अभिनेत्री आलिया भट्ट हिची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. रणबीर आणि आलिया यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर अलं आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.