AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे आहे अमिताभ बच्चन यांचा छोटा भाऊ? काय करतात अजिताभ? ‘या’ कारणामुळे झाला होता भावंडांमध्ये वाद

वडिलांना खुश ठेवण्यासाठी दोघं भावंडं एकत्र यायचे, मात्र त्यांच्या निधनानंतर हा दुरावा आणखी वाढला. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या साखरपुड्यालाही अजिताभ यांनी हजेरी लावली नव्हती.

कुठे आहे अमिताभ बच्चन यांचा छोटा भाऊ? काय करतात अजिताभ? 'या' कारणामुळे झाला होता भावंडांमध्ये वाद
Amitabh and Ajitabh BachchanImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 07, 2023 | 10:54 AM
Share

मुंबई : हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंश राय बच्चन यांचा मोठा मुलगा अमिताभ बच्चन यांना संपूर्ण जग ओळखतं. बॉलिवूडचे महानायक अशी त्यांची ख्याची आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचा चाहतावर्ग आहे. मात्र अमिताभ बच्चन यांचा छोटा भाऊ अजिताभ बच्चन कुठे आहेत आणि काय करतात हे तुम्हाला माहित आहे का? अजिताभ हे लाइमलाइटपासून दूर असल्याने त्यांच्याविषयी फार कोणाला माहित नाही.

अमिताभ यांना बॉलिवूडचा रस्ता दाखवणारे त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान त्यांचे छोटे भाऊ अजिताभ हेच होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार या दोघांचं एकाच शाळेतून आणि कॉलेजमधून शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यानंतर दोघं कोलकाताला गेले. तिथे अमिताभ आणि अजिताभ हे एकत्रच नोकरी करत होते. मात्र अमिताभ यांची ओढ चित्रपटसृष्टीकडे जास्त होती. त्यांना अभिनेता व्हायचं होतं. तेव्हा अजिताभ यांनीच त्यांचे फोटो निर्मात्यांकडे पाठवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांना बऱ्याच नकारांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र अखेर अमिताभ यांचा एक फोटो निवडला गेला.

फोटोची निवड होताच अमिताभ यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिथून त्यांचं फिल्मी करिअर सुरू झालं. अमिताभ यांनी हिरो बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं, मात्र त्यांच्या छोट्या भावाने ते स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली होती. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी बिग बी मुंबईला आले. पण अजिताभ हे कोलकातामध्येच नोकरी करत होते.

अमिताभ बच्चन जेव्हा इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाले, तेव्हा अजिताभसुद्धा मुंबईत आले आणि छोट्या भावाचं सर्व काम सांभाळू लागले. जर कोणाला अमिताभ यांच्याशी भेटायचं किंवा बोलायचं असेल तर आधी अजिताभ यांच्याशीच संपर्क साधला जायचा.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी जेव्हा राजकारणात पाऊल ठेवलं, तेव्हा अजिताभ देश सोडून लंडनला निघून गेले. तिथे त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या व्यवसायासाठी अमिताभ बच्चन यांनी आर्थिक मदत केल्याचंही म्हटलं जातं. त्याकाळी लाखो-कोट्यवधींचा बिझनेस करणारे अजिताभ तिथे खूप प्रसिद्ध झाले होते. त्यांची पत्नी रमौलासुद्धा त्यांची मदत करायची. मात्र जेव्हा बोफोर्स घोटाळ्यामध्ये बिग बींचं नाव समोर आलं होतं, तेव्हापासून भावंडांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

अजिताभ यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना लंडनहून बेल्जियमला जावं लागलं होतं. मात्र याप्रकरणी नंतर अमिताभ आणि अजिताभ या दोघांना क्लिन चिट देण्यात आली होती. अजिताभ यांनी स्वत:च सांगितलं होतं की अमिताभ यांच्यापासून दुरावा तेव्हा वाढू लागला होता, जेव्हा त्यांच्या आयुष्यात राजकारणाशी संबंधित काही मित्र आले होते.

वडिलांना खुश ठेवण्यासाठी दोघं भावंडं एकत्र यायचे, मात्र त्यांच्या निधनानंतर हा दुरावा आणखी वाढला. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या साखरपुड्यालाही अजिताभ यांनी हजेरी लावली नव्हती. 2007 मध्ये अजिताभ लंडनहून भारतात परतले होते. त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला. या दोघांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी एका मुलीचं लग्न बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरशी झालं.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.