AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt | संजूबाबा आजही दुसऱ्या पत्नीला पुरवतो गडगंज पैसा! घटस्फोटानंतर दिली इतकी पोटगी

Sanjay Datt | कोण आहे संजूबाबा याची दुसरी पत्नी, शाही घराण्याच्या लेकीची अभिनेत्याने का सोडली साथ, घटस्फोटानंतर तिलं दिली इतकी प्रॉपर्टी आणि पैसा, आजही दुसऱ्या पत्नीचा खर्च... सध्या सर्वत्र संजय दत्त याच्या खासगी आयु्ष्याची चर्चा... दुसऱ्या पत्नीमुळे अभिनेता चर्चेत...

Sanjay Dutt | संजूबाबा आजही दुसऱ्या पत्नीला पुरवतो गडगंज पैसा! घटस्फोटानंतर दिली इतकी पोटगी
| Updated on: Oct 15, 2023 | 9:45 AM
Share

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : अभिनेता संजय दत्त आता पत्नी मान्यता दत्त आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एका काळ असा होता जेव्हा अभिनेता त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आता देखील संजय दत्त आणि अभिनेत्याच्या भूतकाळाबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. संजय याने तीन लग्न केली आहेत. तर अनेक महिलांसोबत अभिनेत्याचे प्रेमसंबंध देखील होते. संजूबाबा याच्या गर्लफ्रेंड्स पासून ते अभिनेत्याच्या तीन पत्नींबद्दल देखील तुफान चर्चा रंगलेल्या असतात. संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचं निधन कर्करोगामुळे झालं होतं. संजूबाबा यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं. रिचा आणि संजय यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव त्रिशाला दत्त असं आहे. दरम्यान, पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर अभिनेत्याने रिया पिल्लई हिच्यासोबत लग्न केलं.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त आणि रिया पिल्लई यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याने सलग सात सिनेमाने साईन केले. ज्यामुळे पत्नीसाठी अभिनेत्याकडे वेळच नव्हता. अशात रिया आणि संजय यांच्यात सतत वाद होवू लागले. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, संजूबाबा याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा रिया हिच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली होती. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत रिया रिलेशनशिपमध्ये होती. घटस्फोटानंतर रिया आणि संजय यांच्या दोघांचे मार्ग वेगळे झाले. रिया हिने प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत संसार थाटला. पण टेनिसपटूसोबत देखील रिया हिच्या संसार अधिक काळ टिकला नाही.

घटस्फोटानंतर दिली रिया हिला संजूबाबा याने इतकी पोटगी

घटस्फोटानंतर संजूबाबा याने दुसरी पत्नी रिया पिल्लई हिला गडगंज संपत्ती दिली. घटस्फोटा वेळी संजूबाबा याने दुसऱ्या पत्नीला एक आलिशान घर, एक होंडा सीटी कार आणि आठ कोटी रुपये दिले. एवढंच नाही तर, आजही रिया पिल्लई हिच्या शॉपिंगचा खर्च संजूबाबा करतो असं अनेकदा समोर आलं. सध्या सर्वत्र रिया पिल्लई आणि संजूबाबा यांच्या नात्याची चर्चा आहे.

रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिया पिल्लई हिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. रिया पिल्लई आता तिच्या मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिया पिल्लई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?