करीना कपूरवर तिची मुलं तैमूर आणि जेह का सारखं चिडत असतात? स्वत:च सांगितलं कारण
करीना कपूरने विकी कौशलशी झालेल्या मजेदार गप्पांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने अगदी मोकळेपणाने सांगितलं. पण एवढंच नाही तर तिने तिच्या दोन्ही मुलांच्या सवयींबद्दलही सांगितलं. तिचे दोन्ही मुले तिच्यावर का चिडचिड करतात याबद्दलही तिने सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तर सेलिब्रिटी आहेच पण तिच्यासोबत तिच्या मुलांचीही तेवढीच चर्चा होत असते. अनेक मुलाखतींमध्ये ती तिच्या मुलांबद्द बोलताना दिसते. अलीकडेच विकी कौशलशी झालेल्या मजेदार गप्पांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने अगदी मोकळेपणाने सांगितले . तिने सांगितले की नोकरी करणारी आई असणे किती कठीण असते, विशेषतः जेव्हा घरी लहान मुले असतात. करीना म्हणाली की जेव्हा ती शूटिंगसाठी बाहेर जाते तेव्हा तिची मुले तिची खूप आठवण काढतात आणि “अम्मा कुठे आहे?” असं सारखं विचारत असतात.
‘तो थोडा चिडचिड करतो’ हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना करीनाने सांगितले की, या वर्षी सैफ अली खान दोन चित्रपटांच्या शूटिंगसाठी बाहेर होता, त्यामुळे मुलांना त्यांच्या आईसोबत घरी राहण्याची सवय झाली. आता जेव्हा मला 10-15 दिवस किंवा महिन्यातून काही दिवस शूटिंगसाठी जावे लागते तेव्हा मुलांना ते आवडत नाही आणि ते थोडे चिडचिडे होतात. करीनाने हसून सांगितले की मुलांना तिची अनुपस्थिती अजिबात आवडत नाही.
‘बाबा मुलांना थोडे बिघडवतात’ करीनाने पुढे सांगितले की, तिच्या मुलांना सैफसोबत राहायला आवडते कारण तो खूप मजेदार आणि अद्भुत बाबा आहे. जेव्हा सैफ घरी असतो तेव्हा मुलांना टीव्ही पाहण्याची संधी मिळते. त्यांचा मोठा मुलगा तैमूरला सैफसोबत गिटार आणि ड्रम वाजवायला आवडते. करीनाने गमतीने म्हटले की, “जेव्हा मी घरी नसते तेव्हा मुलांना नेहमीच जास्त वेळ टीव्ही पाहायला मिळतो कारण बाबा नेहमीच त्यांना थोडेसे लाडाने वाया घालवतात. नाहीतर, जेव्हा मी घरी असते तेव्हा मी त्यांना टीव्ही पाहू देत नाही आणि सारखी सांगत असते की आता झोपा”. तिने गप्पांमध्ये तिच्या मुलांच्या सवयींबद्दलही सांगितलं.
View this post on Instagram
लग्न 2012 मध्ये झाले होते. करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे लग्न 2012 मध्ये झाले. दोघांची पहिली भेट 2008 मध्ये ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यांनतर सैफ आणि करीना एकमेकांबद्दल कायच बोलताना दिसतात.
