AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू कुटुंबात जन्म, मुस्लिम अभिनेत्याशी लग्न, पण करीना कपूरचा ख्रिश्चन धर्माशी काय संबंध?

करीना कपूर हिंदू कुटुंबात जन्मलेली मुलगी पण तिचे मुस्लिम अभिनेत्याशी लग्न झालं पण तिच्या आयु्ष्यात ख्रिश्चन धर्मालाही तेवढंच आयुष्य आहे. तिचा संबंध हा ख्रिश्चन धर्माशीही आहे. पण कसं काय? चला जाणून घेऊयात

हिंदू कुटुंबात जन्म, मुस्लिम अभिनेत्याशी लग्न, पण करीना कपूरचा ख्रिश्चन धर्माशी काय संबंध?
kareena kapoorImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 14, 2025 | 1:17 PM
Share

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटापेक्षाही त्यांच्या वैयक्तिग आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होताना दिसते. तसेच त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता असते. त्यातीलच एकप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान. करीनाने हिंदू कुटुंबात जन्माला येऊन दुसऱ्या धर्मात लग्न केले. कपूर कुटुंबातील लाडक्या कपूरने घटस्फोटित मुस्लिम अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. लग्नानंतर, अभिनेत्री देखील मुस्लिम धर्माशी जोडली गेली. मात्र हे फार कमी जणांना माहित आहे की, करीना ख्रिश्चन धर्माशी देखील जोडलेली आहे. हे तिच्या जवळच्या एका महिलेनेच खुलासा केला.

करीनाचा ख्रिश्चन धर्माशी काय संबंध आहे?

करीनाचा ख्रिश्चन धर्माशी काय संबंध आहे? याचा विचार नक्कीच पडला असेल. तर करीनाची आई तथा अभिनेत्रीची बाबिबा ही एक ब्रिटिश ख्रिश्चन आहेत. त्यामुळे करिनाचं या धर्माकडे देखील खास आकर्षण आहे.

करीनाच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्म तिच्या आईमुळे आला

बबिता या त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांनी राज कपूर यांचे मोठे पुत्र आणि अभिनेते रणधीर कपूर यांच्याशी लग्न केलं. रणधीर पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. तर बबिताने लग्नानंचरही ख्रिश्चन धर्माचे पालन केले. लग्नानंतर दोघेही करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोन मुलींचे पालक झाले . हिंदू कुटुंबात जन्माला येऊन मुस्लिम अभिनेत्याशी लग्न करण्याव्यतिरिक्त, करीनाच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्माचेही विशेष स्थान होते. करीनाचा या धर्माशी असलेला संबंध ललिता डिसिल्वा हिने एका मुलाखतीदरम्यान उघड केला. ललिता डिसिल्वा या करीनाचा मोठा मुलगा तैमूर अली खान यांना सांभाळणारी त्यांची आया आहे.

करीना कपूर ख्रिश्चन धर्मावरही फार विश्वास ठेवते

ललिता करीनाबद्दल म्हणाली होती की, “करीना कपूर ख्रिश्चन धर्मावरही फार विश्वास ठेवते, पण ती मला म्हणायची की ‘जर तुम्हाला भजन वाजवायला आवडत असेल तर भजन वाजवा’. मी त्यांच्यासाठी (तैमर आणि जेह) साठी भजन गायचे. मग करीना म्हणायची की पंजाबी भजन, एक ओंकार, ती तेच पाळत असे, म्हणून ती तेच वाजवत असत. कारण तिला माहित आहे की मुलांभोवती सकारात्मकता असणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, ती तुमची निवड आहे… पण जर तुम्ही सुरुवातीपासूनच मुलांना सकारात्मक भावनांचा प्रभाव दिलात तर ती सकारात्मकता त्यांच्याकडे आपोआप येते.” तर अशा पद्धतीने करीनाच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्मालाही तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान