AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: …आणि म्हणून अचानक सोडावं लागलं क्रिकेट, नाना पाटेकर यांनी स्वत: सांगितला किस्सा

Nana Patekar Death News: नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे, आता या नंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी समोर येत आहे.

Nana Patekar: ...आणि म्हणून अचानक सोडावं लागलं क्रिकेट, नाना पाटेकर यांनी स्वत: सांगितला किस्सा
| Updated on: Oct 08, 2026 | 12:46 PM
Share

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या घरी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रतिसाद देईनासे झाले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचार अयशस्वी ठरले. पहाटे सुमारे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या अनेक आठवणी समोर येत आहे. आता एक अशी आठवण म्हणजे नाना पाटेकर यांना क्रिकेटर बनायचे होते. नाना पाटेकर लहानपणी खूप क्रिकेट खेळले आणि अशा खेळाडूंसोबत मैदान शेअर केले जे पुढे देशासाठी खेळले. नानांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी १३ वर्षांचे होते, तेव्हा मी मुंबईतील शिवाजी पार्कवर खेळायचो. जेव्हा मी खेळायचो, तेव्हा माझ्यापेक्षा खूप लहान असलेला संदीप पाटीलही माझ्यासोबत खेळायचा. ज्या मैदानावर मी खेळलो, त्याच मैदानावर सुनील गावस्करही खेळले होते.” पण मग नाना यांनी का क्रिकेट सोडले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाना पाटेकर यांनी यामागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, माझ्या बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे मला क्रिकेट सोडावे लागले. मात्र, हे एकमेव कारण नव्हते. मला काम करून आपल्या आई-वडिलांना आधार द्यावा लागत होता, त्यामुळेच मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट सोडल्यानंतर मी एका कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.”

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. अतिशय फिट दिसणारे नाना अचानक सोडून जातील असं कोणालाच वाटले नव्हते.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर