Virat- Anushka: विराट-अनुष्काने का सोडलं भारत? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितलं खरं कारण

Virat Kohli- Anushka Sharma: क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे परदेशात का राहायला गेले, यामागचं कारण माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने यांनी सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या..

Virat- Anushka: विराट-अनुष्काने का सोडलं भारत? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितलं खरं कारण
विराट कोहली- अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित- श्रीराम नेने
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2026 | 7:56 AM

Virat Anushka: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. मात्र, गेल्या काही काळापासून विराट-अनुष्का त्यांच्या दोन मुलांसह लंडनमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्या लंडनमध्ये स्थायिक होण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. पापाराझी कल्चर आणि सेलिब्रिटींना प्रायव्हसी मिळत नसल्याने या दोघांनी भारताबाहेर राहण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जात होतं. आता अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

भारतात यशाचा आनंद घेणं कठीण

श्रीराम नेने यांनी युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याशी झालेल्या भेटींच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी विराटचं कौतुक करत त्याला अत्यंत चांगला आणि नम्र व्यक्ती असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी अनुष्कासोबत झालेल्या एका संभाषणाचा उल्लेख केला. श्रीराम नेने यांनी सांगितलं, भारतात मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे विराट आणि अनुष्काला त्यांचं यश आणि वैयक्तिक आयुष्य मोकळेपणाने अनुभवणं कठीण होत होतं. ते कुठेही गेले किंवा त्यांनी काही केलं तरी लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. त्यामुळे कुटुंबासोबत सामान्य आयुष्य जगण्यासाठी लंडनचा पर्याय त्यांना योग्य वाटला.

मुलांना द्यायचंय सामान्य बालपण

विराट आणि अनुष्कासाठी केवळ स्वतःची प्रायव्हसीच महत्त्वाची नसून, त्यांच्या मुलांचं बालपणही सामान्य पद्धतीने जावं अशी त्यांची इच्छा असल्याचं श्रीराम नेने यांनी सांगितलं. या जोडप्याला मुलगी वामिका आणि मुलगा अकाय अशी दोन मुलं आहेत. दोघांनाही सतत कॅमेऱ्यांच्या नजरेत न ठेवता तुलनेने शांत वातावरणात वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं या वक्तव्यातून स्पष्ट होतं.

श्रीराम नेने यांनी स्वतःच्या अनुभवाचाही दाखला दिला. प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जेवताना किंवा कुटुंबासोबत वेळ घालवतानाही सेल्फीसाठी होणाऱ्या विनंत्या कधी कधी त्रासदायक ठरू शकतात, असं त्यांनी सांगितलं. चाहत्यांचं प्रेम चुकीचं नसतं, मात्र प्रत्येक क्षणी प्रसिद्ध व्यक्ती म्हणून वावरावं लागणं ही मोठी मानसिक आणि सामाजिक किंमत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us