अनुष्काने पहिल्यांदाच शेअर केला मुलगा अकायचा फोटो

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. यात विराट त्याच्या दोन्ही मुलांसोबत दिसून आला. अनुष्काने मुलगा अकायचा फोटो पहिल्यांदाच चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अनुष्काने पहिल्यांदाच शेअर केला मुलगा अकायचा फोटो
Virat Kohli and Anushka Sharma Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 12:57 PM

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली ही सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी आहे. हे दोघं त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कधी व्यक्त होत नाहीत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते अधून-मधून चाहत्यांसोबत कुटुंबाचे फोटो शेअर करत असतात. विराट-अनुष्काने त्यांची मुलगी वामिका आणि मुलगा अकाय या दोघांनाही माध्यमांच्या आणि फोटोग्राफर्सच्या नजरेपासून दूर ठेवलंय. फक्त काही खास दिवशीच विराट आणि अनुष्का त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अशातच विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने त्याचा दोन्ही मुलांसोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना गोड सरप्राइज दिला. मंगळवारी विराटच्या वाढदिवशी अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विराटने एका हाताने त्याची मुलगी वामिकाला उचललंय तर दुसऱ्या हाताने त्याने मुलगा अकायला मिठीत धरलंय.

अनुष्काने वामिकाचे काही फोटो याआधीही सोशल मीडियावर पोस्ट केले होते, मात्र त्यात तिचा चेहरा कधीच दाखवला नव्हता. आता पहिल्यांदाच तिने मुलगा अकायचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या फोटोतही तिने तिच्या दोन्ही मुलांचे चेहरे इमोजीने झाकले आहेत. काही महिन्यांपूर्वी विराट आणि अनुष्का लंडनला शिफ्ट झाले होते. तिथलाच विराटचा हा फोटो असल्याचं कळतंय. विराट आणि अनुष्का यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीतील टस्कनीमध्ये लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिने मुलगा अकायला जन्म दिला. अकायच्या जन्मानंतर तिने पहिल्यांदाच त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

मुलगा अकायच्या जन्माआधी अनुष्का लंडनला राहायला गेली होती. विराटचं कुटुंब सध्या लंडनमध्येच राहत आहे. अकायच्या जन्मानंतर अनुष्काने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे. तिच्या ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट गेल्या काही वर्षांपासून रखडला आहे. प्रेग्नंसीच्या आधी तिने याचं शूटिंग पूर्ण केलं होतं.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.