AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते सुरु केले, ठाणे आणि पुण्यातील तरुणींना जबरदस्ती… मोठे जाळे उघड

राज्यातील एक धक्कादायक रॅकेट समोर आले आहे. या रॅकेटमध्ये स्पाच्या नावाखाली नको ते केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यानंतर पुणे आणि ठाण्यातील महिलांची सुटका करण्यात आली आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते सुरु केले, ठाणे आणि पुण्यातील तरुणींना जबरदस्ती... मोठे जाळे उघड
सांकेतिक फोटोImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 8:06 AM
Share

नांदेड येथील एका स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापार व्यवसायाच्या जाळ्यातून सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटर हे केवळ मसाज केंद्र असल्याचे भासवून अवैध व्यवसायासाठी वापरले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) या प्रकरणात मोठी कारवाई केली असून, परराज्यातील तरुणींचा वापर करून चालवलेला हा अवैध व्यवसाय उघडकीस आला आहे.

पोलिसांनी पाठवले डमी ग्राहक

एलसीबीच्या पथकाने आधी डमी ग्राहक पाठवून खातरजमा केली. डमी ग्राहकाने इशारा देताच पोलिसांनी त्वरित छापा टाकला. या कारवाईत नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे आणि पुणे येथील सात महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली ठेवून देहव्यापारासाठी भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे.

पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त

या छाप्यातून तीन पुरुषांना अटक करण्यात आली. आसाम येथील हीफझुर रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. मात्र स्पा सेंटरचा मालक संतोष बघे अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, अशा प्रकारच्या केंद्रांमधून परराज्यातील महिलांना आमिष दाखवून आणले जाते आणि नंतर त्यांना अवैध व्यवसायात गुंतवले जाते.

सुटका झालेल्या महिलांची चौकशी 

या घटनेने शहरातील स्पा आणि मसाज केंद्रांच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध व्यवसायांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा संशयास्पद केंद्रांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुटका झालेल्या महिलांची चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई वेगाने केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका