
सुप्रसिद्ध नृत्यांगना, महाराष्ट्राला वेड लावणारी, सर्वांना तालावर ठेका धरण्यास भाग पडणारी नर्तिका अर्थात गौतमी पाटील… तिला ओळखत नाही किंवा तिचं नाव ऐकलं नाही असा माणूस विरळाच. गौतमीच्या (Gautami Patil) नृत्याचा कार्यक्रम जिथे होतो, जिथे त्याचे आयोजन होते, तिथे भरभरून गर्दी असते. स्टेजवर आलेली गौतमी देखील आपल्या अदा, नृत्य कला यांनी सर्वांच्या काळजाला हात घालते. तिचं नृत्य सुरू झालं, की बघता समोरच्या लोकांच्या माना डोलू लागतात, कधीकधी प्रेक्षकही तिच्या नृत्यासोबत ठेका धरत नाचात दंग होतात. तिचे सगळो कार्यक्रम तर हाऊसफुल्ल असतातच, पण तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हजारो फॉलोअर्स असून ते तिच्या प्रत्येक पोस्टची, कार्यक्रमाची चाहते वाट बघत असतात.
नुकतीच ती म्युझिक अल्बमध्येही झळकली. अभिजीत सावंतसोबत आलेलं तिचं गाणंही गाजलं. याच गौतमी पाटील बद्दल सध्या नव्या चर्चा कानावर येत आहे. बिग बॉस मराठीचं 6 वं पर्व लवकरच येणार असून त्यात अनेक सेलिब्रिटी दिसणार आहेत. गौतमी पाटील देखील बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन आला होता, तेव्हाही अशाच चर्चा होत्या, तर आता या शोच्या 6 व्यापर्वाची घोषणा झाल्यावर गौतमीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
गौतमी बिग बॉस मराठीत दिसणार ?
याबद्दल आता थेट गौतमीलाच विचारण्यात आलं. ‘बिग बॉस मराठी 6’ या सीझनमध्ये जाणार का असा सवाल गौतमीला विचारण्यात आला, त्यावर तिने अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. नुकतीच गौतमीने एका चॅनेलला मुलाखत दिली, तेव्हा तिने बिग बॉसच्या घरात जाणार की नाही हे अगदी थेट शब्दांत स्पष्ट केलं. यावेळी बोलताना तिने बिग बॉस या शोचं खूप कौतुक केलं. मात्र आपण बिग बॉसच्या घरात जाऊ शकणार नाही असं तिने थेट सांगितलं.
Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील.. तिचं घर पाहिलंत ? दिवाळीनिमित्त शेअर केले खास फोटो
बिग बॉसमध्ये न जाण्याचं कारण काय, गौतमी म्हणाली..
बिग बॉसबद्दल गौतमी भरूभरून बोलली, कौतुकही केलं. ” मला बिग बॉसमध्ये बोलावण्यात आलं होतं. अभिजीत (सावंत) दादाचा सीझन झाला, तेव्हाच मला शोमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारणा करण्यात आली होती. आज जे कोणी बिग बॉसमध्ये जातात त्याचं करिअर होतंच, बिग बॉस खरंच खूप छान (शो) आहे. पण मी शोमध्ये जाऊ शकत नाही, तिथे न जाण्यामागचं माझं कारण वेगळं आहे. माझं कसं आहे ना, मी माझ्या आईला सोडून जास्त दिवस राहू शकत नाही. आत्तापर्यंत मी कधी आईला सोडून 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिले नाहीये. तिला मी सोडू शकत नाही. याच कारणामुळे बिग बॉसच्या घरात जाणं मला शक्य नाही, हेच माझ्या नकाराचं कारण आहे” असं गौतमीने सांगितलवं. पण बिग बॉस खरंच बेस्ट आहे, याचा पुनरुच्चारही गौतमीने केला.
बिग बॉस मराठी सीझन 6 लवकरच सुरू होणार असून यंदाही रितेश देशमुख या शोचा होस्ट असणार आहे. आता गौतमी पाटीलने तर आपण या शोमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आ्हे, त्यामुळे तिच्या नावाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण ती नसली तरी यंदा बिग बॉस मराठीच्या 6 व्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी दिसणार, घरात कोण कोण येणार याची प्रे7कांना खूप उत्सुकता आहे.