Gautami Patil : नाहीतर कार्यक्रमाला येऊ नका.. गौतमी पाटील संतापली, वर्ध्यातल्या राड्यानंतर थेट…
गौतमी पाटीलच्या वर्ध्यातील कार्यक्रमात गोंधळ झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली. प्रेक्षकांना नृत्य नीट दिसले नाही म्हणून खुर्च्यांची तोडफोड झाली. यानंतर ठाण्यात तिच्या लावणीला उत्तम प्रतिसाद मिळाला. माध्यमांशी बोलताना गौतमीने ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली. तिने प्रेक्षकांना शांततेत कार्यक्रम पाहण्याची किंवा येऊ नये अशी थेट विनंती केली. कलाकारांच्या उदरनिर्वाहासाठी गोंधळ थांबवा असे आवाहन तिने केले.

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही आणि तिचे कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतात. तिच्या अदा, नृत्य पाहण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाला तूफान गर्दी होते. मात्र काहीवेळेस गोंधळ होऊन परिस्थिती हाताबाहेर जाते, बिघडते आणि कार्यक्रमाला गालबोट लागतं. काही दिवसांपूर्वी वर्धा येथेही असाच प्रकार घडला. तिथे गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, पण तेव्हा बराच गोंधळ झालेला पहायला मिळाला. वर्धा येथील सांस्कृतिक महोत्सव 2025 या कार्यक्रमात गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. मात्र काही मागच्या प्रेक्षकांना स्टेडवरचा डान्स नीट दिसत नव्हता, त्यामुळे राडा झाला. पैसे देऊनही कार्यक्रम नीट पाहता येत नसल्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ घातला. काही तरूणांनी धुडगूस घालत खुर्च्याची फेकाफेक, तोडफोडही केल्याचे समोर आले.
यामुळे गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली. वर्ध्यातील या राड्यानंतर काल ठाण्यातील शास्त्रीनगर येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख स्वप्निल शेडगे आयोजका तर्फे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी गौतमी पाटील हिचा लावणी परफॉर्मन्स होता. नेहमीप्रमाणे तो हिट झाला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गौतमी वर्ध्यातील राड्यावर प्रतिक्रिया दिली.
मला नेहमी ट्रोल केलं जातं
मी एवढा छान कार्यक्रम करून बाहेर निघते, त्याला चांगला प्रतिसादही मिळतो, पण नंतर माझ्याबाबतीत नेहमी काहीचतरी बोललं जातं, मला ट्रोल केलं जातं असं गौतमी म्हणाले. माझ्या कार्यक्रमाला नेहमी गर्दी असते, त्यातले काही लोक चांगले असतात, पण काही कसे असतील ते सांगता येत नाही. थोडक्यासाठी आम्हा कलाकारांना बोल लावले जातात, ट्रोल केलं जातं अशी मनातली सल तिने बोलून दाखवली. आम्ही सगळेच कार्यक्रम करतो, माझी अख्खी टीम सोबत आहे, आमचं पोटपणा त्या(कार्यक्रमावर) वरच आहे. त्यामळे मी विनंती करेन की ट्रोलिंग थांबवा, असंही गौतमी म्हणाली.
यायचं तर शांततेत नाही तर येऊ नका…
जे झालं ते चुकीचं झालं, माझ्या कार्यक्रमाला जे प्रेक्षक येतात त्यांना माझं एकचं सांगणं आहे, तुम्ही कार्यक्रमाला येतं, एन्जॉय करायला येता, कला बघायला येत असाल, तर तुम्ही प्लीज थोडसं शांततेत कार्यकर्म पूर्ण बघा. तुम्हाला गडबड, गोंधळ करायचा असेल तर असं करू नका, नाहीतर येऊ नका, असं तिने थेट सुनावलं. कार्यक्रमाला आलात तर तो कार्यक्रम व्यवल्थित पार पडू द्या, असं आवाहनही गौतमीने सर्वांना केलं.
