15 व्या वर्षी बालकलाकारने खरेदी केलं कोट्यवधींचं घर; सांगितलं सीक्रेट

'ये है मोहब्बतें' फेम रुहानिकाने 15 व्या वर्षी घेतलं कोट्यवधी रुपयांचं घर; 'या' व्यक्तीला दिलं यशाचं श्रेय

15 व्या वर्षी बालकलाकारने खरेदी केलं कोट्यवधींचं घर; सांगितलं सीक्रेट
अभिनेत्री रुहानिका धवनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 9:20 AM

मुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहब्बतें’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल या मुख्य कलाकारांच्या जोडीसोबत चिमुकल्या रूहीने चाहत्यांची मनं जिंकली होती. ही रुही आता 15 वर्षांची झाली आहे आणि वयाच्या 15 व्या वर्षीच तिने हक्काचं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत बालकलाकार रुहानिका धवनने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. याचसोबत रुहानिकाने हे घर घेण्यामागचं सीक्रेटसुद्धा सांगितलं आहे.

रुहानिकाच्या या यशाबद्दल चाहते तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये रुहानिकाचं घर पहायला मिळतंय. या यशामागचं श्रेय तिने तिच्या आईला दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘वाहेगुरुजी आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे मी ही नवी सुरुवात करू शकले. माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं स्वप्न मी पूर्ण केलंय. माझं हक्काचं घर मी विकत घेतलंय. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मला मिळालेल्या संधींमुळे मी हे स्वप्न पूर्ण करू शकले. अर्थात माझ्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नसतं’, अशा शब्दांत तिने आनंद व्यक्त केला.

‘माझ्या आईचा मी विशेष उल्लेख करेन, कारण माझ्यासाठी ती जणू जादूगारच आहे. ती त्या प्रत्येक आईसारखी आहे, जी प्रत्येक पैसा जमा करून ती रक्कम दुप्पट करते. हे ती तसं करते ते फक्त देव आणि तिलाच ठाऊक असतं. माझ्या स्वप्नांची ही तर सुरुवात आहे. याहून मोठी माझी काही स्वप्नं आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहिलात तर एकेदिवशी यश नक्कीच मिळेल’, असं तिने लिहिलं.

रुहानिकाला ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एक दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.