अल्लाह प्लीज, अल्लाह… एकच धावा… मृत्यूशी झुंज देणाऱ्या अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते हादरले

अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत असून तिने हिंमत न हारता या आजाराचा सामना करण्याचं ठरवलं आहे. या कठी प्रवासात तिचे चाहते तिच्यासोबत असून त्यांच्यासोबत ती अपडेट्स शेअर करत असते. मात्र आता तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली असून त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अल्लाह प्लीज, अल्लाह… एकच धावा... मृत्यूशी झुंज देणाऱ्या अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते हादरले
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 11:38 AM

ये रिश्ता क्या कहलाता मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते. तिने त्यानंतरही अनेक मालिकांत भूमिका केल्या, बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. मात्र गेल्या आठवड्यात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली आणि तिचे चाहते हादरलेच. एक मोठी पोस्ट लिहून हिनाने या आजाराबद्दलचा खुलास केला आणि या कॅन्सरची थर्ड स्टेज सुरू असून आपण त्यावर उपचार घेत असल्याचेही तिने स्पष्ट केले. तिच्या आजाराची बातमी ऐकून हादरलेल्या चाहत्यांनी तिचं बळ वाढवण्यासाठी कमेंट्सची बरसात केली आणि तिला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थनाही सुरू केली. या आजारामुळे हिनाही कुठे ना कुठे थोडी घाबरली आहे, मात्र तरीही तिने हिंमत न हारता या आजाराचा सामना करण्याचे ठरवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे केस कापून टाकण्याचा निर्णय जाहीर करत व्हिडीओ शेअर केला. त्यालाही असंख्य लाईक्स मिळाले आणि लोकांनी तिचे कौतुक करत तिला धीरही दिला. मात्र याचदरम्यान काल रात्री हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर अशी एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामधून या आजाराशी लढताना तिच्या मनाची होणार घालमेल स्पष्ट दिसून येत्ये. त्यामुळे तिचे चाहतेही खूप इमोशलन झाले आहेत.

काय आहे हिना खानची नवी पोस्ट ?

हिना खानने इन्स्टाग्रावर स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अल्लाहची आठवण करताना दिसत आहे. तिने लिहिले आहे की, अल्लाहशिवाय कोणीही तुमचे दुःख दूर करू शकत नाही.

केसही कापले

चाहत्यांना ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितल्यानंतर हिनाने 4 जुलै एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिचे लांबसडक केस कापण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामध्ये हिना आपले केस कट करताना दिसली.मात्र मुलीची स्थिती पाहून तिची आई रडताना दिसत होती. या व्हिडीओमध्ये हिनाने नीडरपणे आजाराचा सामान करणार असल्याचे नमूद केले होते. माझे सुंदर केस गळून जाण्यापेक्षा मी त्यांना सोडण्याचा निर्णय घेतलाय. मी काही आठवडे या मानसिक त्रासामधून जाऊ इच्छित नाहीये. त्यामुळे मी स्वत: हा निर्णय घेतला. माझी ताकद आणि माझे प्रेम माझ्या स्वत:वर आहे आणि हा या केसांचा एक चांगले विग बनवण्याचा निर्णय देखील मी घेतला आहे, असेही हिना खान हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

हिना खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने 2009 पासून ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये काम करायला सुरुवात केली, त्यानंतर ती बिग बॉस 11 आणि बिग बॉस 14 सारख्या शोमध्ये दिसली. यानंतर ती कसौटी जिंदगी के मध्ये कोमोलिकाच्या निगेटीव्ह भूमिकेतही दिसली होती. याशिवाय तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण करत काही चित्रपटातही काम केले.

Non Stop LIVE Update
प्रसाद लाडांनंतर जरांगे आणि दरेकरांमध्ये शाब्दिक वॉर, काय दिला इशारा?
प्रसाद लाडांनंतर जरांगे आणि दरेकरांमध्ये शाब्दिक वॉर, काय दिला इशारा?.
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.