AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल; चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

शिवांगीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नायराची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने 'खतरों के खिलाडी' या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल; चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
Shivangi JoshiImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवांगीला किडनी इन्फेक्शन झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारासाठी तिला पुढील काही दिवस रुग्णालयातच राहावं लागणार आहे. हॉस्पीटल बेडवरून शिवांगीने फोटो पोस्ट केला असून चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन तिने चाहत्यांना आणि मित्रमैत्रिणींना केलं आहे.

शिवांगीने या पोस्टमध्ये लिहिलं, ‘गेले काही दिवस जरा कठीण गेले आहेत. मला किडनी इन्फेक्शन झालं आहे. पण माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी माझ्यासोबत आहेत. रुग्णालयात माझी खूप चांगली काळजी घेतली जात आहे. सध्या मला बरं वाटतंय. तुम्हीसुद्धा तुमच्या शरीराची, आरोग्याची काळजी घ्या. शरीरात पाण्याची कमी होऊ देऊ नका. मी लवकरच पुन्हा जोमाने कामाला लागेन. सध्या तब्येतीत बरीच सुधारणा आहे.’

शिवांगीच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. ‘लवकर बरी हो, तुला खूप प्रेम’ असं एका युजरने लिहिलं. तर ‘काळजी घे’, असंही अनेकांनी म्हटलंय. श्रद्धा आर्या, श्वेता तिवारी, धीरज धूपर, रुबिना दिलैक, प्रित कमानी, चेतना पांडे, श्रेणू पारिख यांसारख्या कलाकारांनीही कमेंट करत तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.

शिवांगी लवकरच एकता कपूरच्या शोमध्ये झळकणार आहे. ‘ब्युटी अँड बीस्ट’ या शोमध्ये ती दुहेरी भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या शोच्या ओपनिंग एपिसोडच्या शूटिंगसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. जवळपास सात दिवस या ओपनिंग एपिसोडचं शूटिंग होणार आहे. तर पहिला एपिसोड हा एक तासाचा दाखवण्यात येणार आहे. शिवांगीने काही दिवसांपूर्वीच ‘बालिका वधू 2’ या मालिकेत भूमिका साकारली होती. शालीन भनोटच्या ‘बेकाबू’ या मालिकेतही ती पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

शिवांगीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायराची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने ‘खतरों के खिलाडी’ या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप