Armaan Malik | युट्यूबर अरमान मलिकचा एक महिन्याचा मुलगा रुग्णालयात दाखल; कुटुंबीय चिंतेत

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे.

Armaan Malik | युट्यूबर अरमान मलिकचा एक महिन्याचा मुलगा रुग्णालयात दाखल; कुटुंबीय चिंतेत
Youtuber Armaan MalikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 2:14 PM

हैदराबाद : प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर अरमानची तगडी फॅनफॉलोईंग आहे आणि चाहत्यांसोबत तो त्याच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी मोकळेपणे शेअर करताना दिसतो. अरमान मलिक नुकताच तीन मुलांचा पिता बनला आहे. त्याची पहिली पत्नी पायलने जुळ्या मुलांना जन्म दिला. तर दुसरी पत्नी कृतिकाने मुलाला जन्म दिला. एकीकडे अरमानच्या घरी आनंदाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे नवीन समस्या निर्माण झाली आहे. अरमान आणि कृतिकाचा मुलगा झैदची तब्येत बरी नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याबद्दलची माहिती खुद्द अरमानने नुकत्याच एका व्हिडीओतून दिली आहे.

कृतिकाच्या चिमुकल्या मुलाची तब्येत बिघडली

13 मे रोजी अरमानने एक व्हिडीओ शेअर काल, ज्यामध्ये त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका हे मुलगा झैदच्या प्रकृतीविषयी बोलताना दिसत आहेत. पायल मलिकसोबत कृतिका तिच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेली होती. डॉक्टरांनी त्याला काही औषधं दिली, मात्र तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दोन वेळा डॉक्टरांकडे नेऊनसुद्धा त्याला बरं वाटलं नाही. अखेर झैदला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

पायल-कृतिका भावूक

कृतिकाने मुलाच्या तब्येतीविषयी माहिती देताना सांगितलं की झैदला डायरिया आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवतोय. याशिवाय तिने असंही सांगितलं की त्याच्या मलातून रक्ताचे थेंब दिसत आहेत. हे पाहून कृतिका आणि पायल दोघींना चिंता वाटू लागली होती. कारण चार तासांपासून त्याने टॉयटेलसुद्धा केलं नव्हतं.

मुलाच्या प्रकृतीविषयी सांगताना कृतिका रडू लागली आणि तिला पाहून पायललाही अश्रू अनावर झाले. यावेळी अरमान दोघींना सावरण्याचा प्रयत्न करतो. पायल आणि कृतिका सध्या त्यांच्या तिन्ही मुलांच्या तब्येतीसाठी काळजी व्यक्त करत आहेत. “कदाचित माझ्या मुलांना नजर लागली आहे, म्हणूनच एकानंतर एक आजारी पडत आहे”, असं अरमान म्हणाला. अरमानच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका या एकत्र गरोदर होत्या. त्यापैकी कृतिकाने एप्रिल महिन्यात बाळाला जन्म दिला.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.