AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरमान मलिकने दोन बायका मुलं असताना नॅनीसोबत केलं लग्न? काय आहे सत्य?

Armaan Malik on Fourth Marriage: अरमान मलिकने दोन बायका मुलं असताना नॅनीसोबत केलं लग्न? करवाचौथच्या दिवशी असं काय झालं होतं? नक्की काय आहे सत्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरमान मलिक याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

अरमान मलिकने दोन बायका मुलं असताना नॅनीसोबत केलं लग्न? काय आहे सत्य?
| Updated on: Oct 29, 2024 | 2:49 PM
Share

Armaan Malik on Fourth Marriage: यूट्यूबर आणि बिग बॉस फेम अरमान मलिक कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. बिग बॉसमुळे अरमान याची तुफान चर्चा रंगू लागली. सांगायचं झालं तर, अरमान याने आतपर्यंत तीन लग्न केली आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अरमान याने दुसरं लग्न पायल मलिक हिच्यासोबत केलं. त्यानंतर पायल हिला घटस्फोट न देता अरमान याने पायलती मैत्रीण कृतिका हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. आता अरमान दोन्ही बायका आणि चार मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

बिग बॉसच्या घरात देखील अरमान याने दोन बायकांसोबत एकत्र एन्ट्री केली. पण आता अरमान याच्या चौथ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अरमानच्या मुलांची नॅनी लक्ष्या त्याच्यासोबत घरी राहते. अरमान लक्ष्यासोबत व्हिडिओ बनवतो आणि जिम करतो. नुकताच, करवा चौथच्या दिवशी, लक्ष्यने स्वतःच्या मेहेंदीमध्ये संदीप असं नाव लिहिलं होतं. संदीप हे अरमानचं दुसरं नाव आहे.

याशिवाय लक्ष्य हिने करवा चौथचा उपवासही ठेवला होता आणि अरमानसोबत उपवास सोडतानाचा व्हिडिओही बनवला होता. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला होता. ज्यामुळे अरमान याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चांना जोर धरला, दरम्यान अरमान याची पत्नी पायल हिने प्रतिक्रिया दिली आहे.

रंगणाऱ्या चर्चांवर अरमान म्हणाला, ‘दोन बायका असताना लोकं म्हणत आहेत की, अरमान याने तिसरं लग्न केलं आहे. लक्ष्यत्या हातावर संदीप लिहिलं आहे. लक्ष्य ही ससरदार समुदायातील आहे. तेथे संदीप पुरुष आणि स्त्री दोन्ही नाव असू शकतात. त्यामुळे लक्ष्यने तिच्या हातावर लिहिलेलं नाव माझं आहे असं काहीही नाही.’

‘लक्ष्यचा साखरपुडा झाला असेल आणि तिच्या होणाऱ्या पतीचं नाव देखील संदीप असेल… असं देखील होऊ शकतं… लक्ष्यचे खासगी आयुष्य आहे. ती स्वतःला जे हवं ते करु शकते. प्रत्येक गोष्टीचा संबंध माझ्यासोबत जोडण्याची काहीही गरज नाहा…’ असं अरमान म्हणाला.

रंगणाऱ्या चर्चांवर पायल हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला ट्रोल करण्यात येत आहे. दोन बायका असताना तिसऱ्या लग्नासाठी होकार कसा दिला… असा प्रश्न आम्हाला विचारण्यात येत आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही लवकरच देवू… स्वतः लक्ष्य यावर बोलेल…’ असं देखील पायल म्हणाली.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...