
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याच्या घरी आता (Yuvraj Singh) पाळणा हलला आहे. युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल कीच यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती ही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. युवराज सिंह आणि हेजल कीच (Hazel Keech) यांच्या पोस्टनंतर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव हा चाहत्यांकडून केला जात आहे. फक्त चाहतेच नाही तर अनेक क्रिकेटर आणि सेलिब्रेटिंनी देखील यांना आता शुभेच्छा देण्यास सुरूवात केलीये. यांनी शेअर केलेली पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे युवराज सिंह याच्या घरी आता एका गोंडस मुलीने जन्म घेतला आहे. युवराज सिंह आणि हेजल कीच यांना मोठा मुलगा आहे आणि आता मुलीने जन्म घेतला आहे. मुलीच्या जन्मानंतर युवराज सिंह आणि त्याची पत्नी खूप जास्त आनंदामध्ये दिसत आहेत. फक्त मुलीच्या जन्माची बातमीच नाही तर एक खास फोटो देखील शेअर करण्यात आलाय.
युवराज सिंह आणि त्याच्या पत्नीकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, युवराज सिंह याच्या मांडीवर मुलगी आहे आणि हेजल हिच्या मांडीवर मुलगा आहे आणि दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत हेजल हिने लिहिले आहे की, न झोप घेता जाणारी रात्र आता मजेदार वाटत आहे. कारण आम्ही आमची प्रिंसेज औरा हिचे स्वागत केले आहे.
आता या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. विशेष म्हणजे युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल कीच यांनी या पोस्टसोबतच आपल्या लेकीच्या नावाची देखील घोषणा केलीये. युवराज सिंह आणि हेजल यांनी आपल्या मुलीचे नाव औरा ठेवले आहे. या फोटोमध्ये औरा ही देखील दिसत असून अत्यंत गोंडस मुलगी युवराज सिंह याची आहे.
30 नोव्हेंबर 2016 रोजी युवराज सिंह आणि हेजल यांचे लग्न झाले आहे. विशेष म्हणजे युवराज सिंह याच्या पत्नीने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. सलमान खान याच्या बॉडीगार्ड चित्रपटात करीना कपूर हिच्या मैत्रीणीच्या भूमिकेत हेजल कीच ही दिसली होती. हेजल कीच हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.