
Yuzvendra Chahal on Divorce: भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात युजवेंद्र आणि धनश्री यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर क्रिकेटरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. वर्षाच्या सुरुवातील चहल याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आणि घटस्फोटाच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. याकारणामुळे युजवेंद्र याचं मानसिक तणाव देखील वाढलं होतं. एवढंच नाही तर, स्वतःला संपवण्याचा विचार देखील त्याने केलेला.
नुकताच झालेल्या मुलाखतीत युजवेंद्र चहल याने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘दोघांमधील वाद बऱ्याच काळापासून सुरु होते. पण आम्ही ठरवलं होतं विभक्त होण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत काहीही बोलायचं नाही आणि सोशल मीडियावर देखील सामान्य कपल म्हणून राहू…’ असं युजवेंद्र म्हणाला.
पुढे युजवेंद्र याला विचारण्यात आलं एकत्र राहण्याचा फक्त देखावा करत होता का? यावर क्रिकेटर म्हणाला, ‘नात्यात एक प्रकारची तडजोड करावी लागते. एक नाराज असेल तर, दुसऱ्याला कायम ऐकावं लागतं… कधी – कधी एकमेकांचे स्वभाव पटत नाहीत. मी भारतासाठी खेळत होतो आणि ती सुद्धा तिच्या कामाच व्यस्त होतं. असं जवळपास 1 – 2 वर्षांपासून सुरु होतं…’
‘मी दोन्हीकडे वेळ देत होतो, पण नात्याबद्दल विचार करायला वेळ नव्हता आणि प्रत्येक दिवशी वाटायचं की आता बस्स झालं… सोडून द्या… प्रत्येकाचं आपलं स्वतःचं आयुष्य असतं आणि लक्ष्य असतात. एक जोडीदाराच्या नात्याने प्रत्येक प्रसंगात साथ हवी असते….’
‘जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा अनेकांनी मला दगाबाज म्हटलं. पण मी कोणाहीसोबत दगाबाजी केली नाही. माझ्या दोन बहिणी आहेत आणि आई – वडिलांनी कायम मला महिलांचा आदर करायला शिकवलं आहे. जर माझं नाव एखाद्याशी जोडलं जात असेल तर लोकांनी त्याबद्दल काहीही लिहावे हे आवश्यक नाही.’
भावूक होत युजवेंद्र चहल म्हणाला, ‘मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मी स्वतःच्या आयुष्याला त्रासलेलो. 2 तास मी रडयाचो आणि 2 तास झोपायचो… असं जवळपास 40 – 45 दिवस सुरु होतं. मला क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा होता. मी क्रिकेटमध्ये इतका व्यस्त होतो की मी लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी या गोष्टी माझ्या मित्रासोबत शेअर केल्या.’ सध्या सर्वत्र युजवेंद्र चहल याच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर धनश्री आणि युजवेंद्र यांनी एकमेकांना डेट केलं आणि 22 डिसेंबर 2020 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.20 मार्च 2025 मध्ये वांद्रे हायकोर्टात दोघांच्या घटस्फोटावर निकाल सुनावण्यात आला.