‘महावतार नरसिम्हा’ सिनेमामुळे अजय देवगणला मोठा धक्का, मोठं नुकसान होण्याची शक्यता?
Advance Booking Report: ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला, यामुळे अजय देवगणला बसलाय मोठा फटका, अभिनेत्याचे मोठं नुकसान होण्याची शक्यता...
ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे आणि बॉक्स ऑफिसवर कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्याच्या मनावर ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाने राज्य केलं आहे. पण याचा फटका अभिनेता अजय देवगण स्टारर ‘सन ऑफ सरदार 2’ आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी स्टारर ‘धडक 2’ सिनेमाला पडताना दिसणार आहे. 1 ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दोन्ही देखील हीट सिनेमांचे सिक्वल आहेत. ‘सन ऑफ सरदार 2’ आणि ‘धडक 2’ सिनेमांच्या शर्यतीत ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा पुढे आहे. पण ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत‘महावतार नरसिम्हा’ पुढे आहे.
सांगायचं झालं तर, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘धडक’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. पण आता या दोन सिनेमांच्या सिक्वलला प्रेक्षक किती डोक्यावर घेतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण दोन्ही सिनेमांना मागे टाकत ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर स्वतःचं राज्य तयार केलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, चार सिनेमांच्या ॲडव्हान्स बुकिंगचा रिपोर्ट समोर आला आहे. पहिल्या दोन आठवड्यात ब्लॉकबस्टर बिझनेस झाला असला तरी, ‘सैयारा’ तिसऱ्या आठवड्यातही चांगली कामगिरी करत राहील. 1 ऑगस्टसाठी सिनेपोलिसमध्ये अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे खालीलप्रमाणे आहेत.
महावतार नरसिम्हा: 4500
सन ऑफ सरदार 2: 4000
धडक 2: 3000
सैयारा: 1800
‘सन ऑफ सरदार 2’ आणि ‘धडक 2’ सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाचा सिक्वल आहे. सिनेमात अजय देवगण, गुरु रंधावा, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. तर आता मृणाल ठाकुर, रवि किशन, मुकुल देव आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
तर दुसरीकडे, ‘धडक 2’ सिनेमा रोमांटिक सिनेमा आहे. ‘धडक 2’ ‘धडक’ सिनेमाचा सिक्वल आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ‘धडक’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं… आता कोणता सिनेमा बाजी मारतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘धडक 2’ सिनेमात तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
