AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zubeen Garg’s Last Wish : माझ्या निधनानंतर तिथेच..; झुबीन गर्गने व्यक्त केली होती शेवटची इच्छा

Zubeen Garg's Last Wish : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान त्याचं निधन झालं. अशातच झुबीनची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली होती.

Zubeen Garg's Last Wish : माझ्या निधनानंतर तिथेच..; झुबीन गर्गने व्यक्त केली होती शेवटची इच्छा
Zubeen Garg Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 21, 2025 | 11:47 AM
Share

Zubeen Garg’s Last Wish : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्याने त्याची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मृत्यूनंतर माझ्या अस्थी ब्रह्मपुत्रा नदीत विसर्जित कराव्यात, अशी इच्छा त्याने बोलून दाखवली होती. ‘या अली’ गाण्यामुळे लोकप्रिय झालेला प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्गचं 19 सप्टेंबर रोजी अचानक निधन झालं. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाला. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी तो तिथे गेला होता. झुबीनच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. देशभरातील चाहते सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच झुबीनची ही जुनी मुलाखत चर्चेत आली आहे.

जानेवारी 2025 मध्ये दिलेल्या मुलाखतीत झुबीनने त्याला त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस कुठे आणि कसा घालवायचा आहे, याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, “मी वेडा आहे. मला माझ्याकडे असलेलं सर्वकाही लोकांना द्यायचं आहे. स्वत:साठी काही ठेवायचं नाहीये. मी असाही आनंदी आहे. माझा स्वत:चा स्टुडिओ आहे, माझं घर आहे. मला माझे शेवटचे क्षण टिल्लामध्ये घालवायचे आहेत. हे ठिकाण महाबहू ब्रह्मपुत्र रिव्हर हेरिटेज केंद्रात आहे. ही खूप चांगली जागा आहे. ही सर्वांत चांगल्या स्थळांपैकी एक आहे. तिथे एक छोटासा बंगला असेल. मी तिथेच राहीन आणि तिथेच अखेरचा श्वास घेईन. जेव्हा माझं निधन होईल, तेव्हा लोकांनी तिथेच माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत किंवा मला ब्रह्मपुत्रा नदीत वहावं. मी एक शिपाई आहे. मी रॅम्बोसारखा आहे.”

View this post on Instagram

A post shared by Zubeen Garg (@zubeen.garg)

मिळालेल्या माहितीनुसार, झुबीन गर्गला सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान समुद्रात श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर त्याला सिंगापूरमधील जनरल हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शनिवारी झुबीनचं पार्थिव विमानाने गुवाहाटीला आणण्यात आलं. त्यावेळी विमानतळावर त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?