AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Republic Day 2024 Wishes : तुमच्या प्रियजनांना पाठवा प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा संदेश

Republic Day 2024 Wishes Marathi प्रजासत्ताक दिनानिमित्त, तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना एक चांगला नागरिक होण्यासाठी प्रोत्साहित करू शकता आणि भारतीय असल्याचा अभिमान बाळगू शकता. येथे प्रजासत्ताक दिनाचे काही खास देशभक्तीपर संदेश आहेत, जे तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा (Republic Day 2024 Wish Marathi) देण्यासाठी पाठवले जाऊ शकतात.

Republic Day 2024 Wishes : तुमच्या प्रियजनांना पाठवा प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा संदेश
प्रजासत्ताक दिवसImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 26, 2024 | 10:44 AM
Share

मुंबई :  स्वतंत्र भारताचा सर्वात गौरवशाली दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना देशात अधिकृतपणे लागू झाली. तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी राष्ट्राचे घटनात्मक प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती राजपथावरून तिरंगा फडकवतात आणि देशाला सलाम करतात. त्यांच्यासोबतच प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक देशवासीयाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्या क्रांतिकारकांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना अभिवादन करतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त, तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना एक चांगला नागरिक होण्यासाठी प्रोत्साहित करू शकता आणि भारतीय असल्याचा अभिमान बाळगू शकता. येथे प्रजासत्ताक दिनाचे काही खास देशभक्तीपर संदेश आहेत, जे तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा (Republic Day 2024 Wish Marathi) देण्यासाठी पाठवले जाऊ शकतात.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते

सूर्य तळपतो प्रगतीचा

भारतभूमीच्या पराक्रमाला

मुजरा हा मानाचा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला…

भारत देशाला मानाचा मुजरा!

Happy Republic Day!

देश विविध रंगाचा,

देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा

त्यांच्या चणरी ठेवितो माथा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक देश, एक स्वप्न,

एक ओळख

आम्ही भारतीय…!

Happy Republic Day 2024!

स्वतःसाठी स्वप्न सगळेच बघतात,

देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,

चला आपण आपला भारत

सुरक्षित आणि विकसित बनवूया

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

मुक्त आमचे आकाश सारे,

झुलती हिरवी राने वने,

स्वैर उडती पक्षी नभी,

आनंद आज उरी नांदे,

Happy Republic Day 2024!

बलसागर भारत व्हावे,

विश्वात शोभूनी राहावे,

भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी

हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिरंगा उंच उंच उडू द्या,

आपल्या हृदयातील अभिमान आणि एकतेने,

या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या राष्ट्राला

एक चांगला भाग बनवूया

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

असा भारत हवाय, जिथे सगळ्यांची जात भारतीय असेल,

धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल,

नातं असेल भारतीयत्वाचा, सुख शांती समाधान मिळेल,

शत्रूचा थरकाप उडवील, एवढी विचारांना धार असेल,

प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल,

जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.