AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narak Chaturdashi 2023 : नरक चतुर्दशीला कोणाची पूजा केली जाते? अत्यंत रंजक आहे पौराणिक कथा

Narak Chaturdashi 2023 नरक चतुर्दशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवस आधी येतो. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही.

Narak Chaturdashi 2023 : नरक चतुर्दशीला कोणाची पूजा केली जाते? अत्यंत रंजक आहे पौराणिक कथा
नरक चतुर्दशीImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 11, 2023 | 9:05 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. नरक चतुर्दशी दिवाळीच्या एक दिवस आधी आणि धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी येतो. नरक चतुर्दशीला काळी चतुर्दशी (Narak Chaturdashi 2023) असेही म्हणतात. भारतातील काही ठिकाणी नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात फक्त हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. एखादा आजार किंवा कोणत्याही अपघातामुळे होणारी मृत्यूची भीती दूर करण्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी उटणे लावून आंघोळ करतात. या दिवशी संध्याकाळी यम तर्पण आणि दिवे दान करण्याची परंपरा आहे. नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे काही रंजक कथा आहेत. असे मानले जाते की या दिवशी दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते.

नरक चतुर्दशीचे महत्त्व

नरक चतुर्दशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवस आधी येतो. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही.

असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून आंघोळ केली. तेल आणि उटणं लावून आंघोळ करण्याची ही परंपरा त्या दिवसापासून सुरू झाली. असे केल्याने नरकापासून मुक्ती मिळून स्वर्ग आणि सौंदर्याचे वरदान मिळते, अशी धार्मिक धारणा आहे.

नरक चतुर्दशी का साजरी केली जाते?

नरक चतुर्दशी सण नरकासुर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एके काळी नरकासुर नावाचा राक्षस होता ज्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देव, देवी आणि ऋषींसह सोळा हजार राजकन्यांना कैद केले होते. यानंतर, राक्षसांच्या अत्याचाराने त्रासलेल्या देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली, त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार या दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवताही खूप आनंदी होते. या दिवशी नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो, याला छोटी दिवाळी असेही म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.