अहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी

शिर्डी जवळील निमगाव-कोऱ्हाळे येथील भाजी विक्रेती महिला कोरोना बाधित आढळल्यानंतर तिच्या संपर्कातील आणखी 4 जणांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे (Corona infection by vegetable saler women).

अहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी

अहमदनगर : शिर्डी जवळील निमगाव-कोऱ्हाळे येथील भाजी विक्रेती महिला कोरोना बाधित आढळल्यानंतर तिच्या संपर्कातील आणखी 4 जणांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे (Corona infection by vegetable saler women). त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 29 जणांचे स्त्राव कोरोना चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 14 जणांचे अहवाल मिळाले असून त्यातील 4 जण कोरोनाबाधित आढळले. मात्र, अद्याप 15 संशयितांचे अहवाल बाकी आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित भाजी विक्रेती महिला 2-3 वेळा राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत माल खरेदीसाठी गेली होती. त्यामुळे तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बाजार समिती पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीतील हमाल, मापाडी, मजूर आणि व्यापारी अशा एकुण 200 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राहाता, शिर्डी परिसर कोरोनामुक्त झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी लोणी येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला. उपचारानंतर तो बराही झाला. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाला. परंतु 2 दिवसांपूर्वी शिर्डी जवळील निमगाव येथील भाजी विक्रेती महिला कोरोनाबाधित आढळली. या महिलेच्या संपर्कातील 4 जणही आज बाधित असल्याचं समोर आलं. यामुळे शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर महिलेच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत याचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येतो आहे. राहाता बाजार समितीत महिलेचा संपर्क आल्याने बाजार समितीत आज 200 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी पुढील काही दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. राहाता बाजार समितीत फळे, भाजीपाला तसेच कांदा लिलाव केला जातो. रेडझोनमधून माल वाहतूक होते. त्यामुळे वाहनांची ये-जा सुरु असते. बाजार समितीत काम करणारे देखील शेजारच्या तालुक्यातून रोज ये –जा करतात. रेड झोनमधून येणाऱ्या कामगारांमुळे देखील कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. आता प्रशासन आरोग्य तपासणी सोबत कामगारांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या :

Shirdi Corona | भाजी विक्रेत्या महिलेला कोरोना, संपूर्ण गाव होम क्वारंटाईन

Lockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण

दीड वर्षाच्या बाळापासून दूर राहून नर्सची 14 दिवस रुग्णसेवा, कोरोनाच्या लढाईत योगदान

Corona infection by vegetable saler women

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *